पनवेलमध्ये 6क्क्क् नवीन मतदार

By admin | Published: September 19, 2014 11:04 PM2014-09-19T23:04:51+5:302014-09-19T23:04:51+5:30

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार पनवेल तालुक्यात मतदार नोंदणी कार्यक्रम राबविण्यात आला.

Six hundred new voters in Panvel | पनवेलमध्ये 6क्क्क् नवीन मतदार

पनवेलमध्ये 6क्क्क् नवीन मतदार

Next
प्रशांत शेडगे - पनवेल
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार पनवेल तालुक्यात मतदार नोंदणी कार्यक्रम राबविण्यात आला. दहा दिवसांत आणखी 6 हजार 225 मतदारांनी नोंदणी केल्याने ही संख्या सव्वा चार लाखांच्या घरात पोहचली आहे. मतदार नोंदणीत तालुका आघाडीवर असल्याची माहिती आहे.
मागील काही वर्षात मतदानाची टक्केवारी कमी होत चालली आहे, त्याचबरोबर अनेकांची नावे मतदारयादीत आढळत नसल्याने लोकसभा निवडणुकीच्या अगोदर देशभरात प्रचंड जागृती करण्यात आली. त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढल्याचे आढळून आले आहे. असे असले तरी पुणो येथे लाखो मतदारांची नावे गायब झाली. 
परिणामी, अनेकजण मतदानापासून वंचित राहिले. हे प्रकरण थेट निवडणूक आयोग आणि उच्च न्यायालयामार्फत गेले. आयोग आणि न्यायालयाने काही सूचना दिल्या. त्यानुसार आगामी विधानसभा निवडणुकीत कोणीही मतदानापासून वंचित राहू नये याकरिता 17 सप्टेंबर्पयत राज्यात विशेष मतदार नोंदणी अभियान हाती घेण्यात आले होते. त्यानुसार मागीलवेळी झालेल्या फोटो, पत्ते आणि याद्यांमधील त्रुटी काढून टाकण्यात आल्या. त्याचबरोबर नवीन मतदार नोंदणीही करण्यात आली. आगामी विधानसभा निवडणुकीतही लोकसभेप्रमाणो कोणत्याही अडचणी येवू नयेत तसेच कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, असा आदेश जिल्हाधिकारी सुमंत भांगे, प्रांताधिकारी आणि तहसीलदारांना काढला. त्यानुसार प्रांताधिकारी सुदाम परदेशी आणि तहसीलदार पवन चांडक यांनी मतदारनोंदणी अभियानाकडे विशेष लक्ष पुरवले आहे. त्यांना या कामी नायब तहसीलदार उमेश पाटील, अधिक पाटील, मंडल अधिकारी, तलाठी आणि महसूल कर्मचा:यांची मोठी मदत झाली. (वार्ताहर)
 
1रायगड जिल्हय़ात पनवेल विधानसभा मतदारसंघ हा शहरी बहुल म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी शहरी मतदारांचे प्रमाण सर्वाधिक आहे. कळंबोली, कामोठे, खारघर, नवीन पनवेल या सिडको वसाहतीत सुमारे सव्वा दोन लाख मतदार आहेत. यंदा नव्या मतदारांमध्ये मोठी वाढ झाली आहे.
 
2नोकरी, व्यवसायानिमित्त येथे देशाच्या कानाकोप:यातून लोक स्थायिक झाले आहेत. अनेकांनी घरे खरेदी के ल्याने शिधापत्रिका याच ठिकाणी नोंदविण्यात आल्या आहेत. एकंदरीत स्थायिक झालेल्या या मंडळींनी आपली नावे पनवेल विधानसभा मतदारसंघात नोंदविली आहेत. 

 

Web Title: Six hundred new voters in Panvel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.