धुळे जिल्ह्यात दोन अपघातांत सहा ठार
By Admin | Published: May 10, 2017 02:12 AM2017-05-10T02:12:39+5:302017-05-10T02:12:39+5:30
मंगळवारी जिल्ह्यात दोन अपघातांमध्ये सहा जण ठार तर नऊ जण जखमी झाले. त्यात साक्री- पिंपळनेर रस्त्यावर धाडणे गावाजवळ
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : मंगळवारी जिल्ह्यात दोन अपघातांमध्ये सहा जण ठार तर नऊ जण जखमी झाले. त्यात साक्री- पिंपळनेर रस्त्यावर धाडणे गावाजवळ दुपारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास रिक्षा, पिकअप व्हॅन आणि मोटारसायकल यांच्या तिहेरी अपघातात चार जण ठार तर सात जण जखमी झाले तर नरडाणा येथे उभ्या ट्रकला मागून दुसऱ्या ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन जण ठार तर दोन जण जखमी झाले.
धुळे जिल्ह्यात दोन दिवसांत तीन अपघातात ९ जण ठार झाले आहेत. धाडणे गावाजवळील अपघातात संतोष प्रकाश डोंबरे (२५), एकनाथ अप्पा माळी (३५) आणि रिक्षातील संतोष नानाभाऊ मोरे (६५) हे जागीच ठार झाले. उपचारादरम्यान साक्री येथे वसंत
राघो अहिरराव यांचा मृत्यू झाला. नरडाणा येथील अपघातात दोन्ही ट्रकचे चालक मुहम्मद अक्रम मुहम्मद मंगळू व नंदू चौहान हे मृत्युमुखी पडले.