मुलीस जिवे ठार मार म्हणून सहा जणांनी विवाहित महिलेस बेदम मारहाण
By admin | Published: July 29, 2016 08:07 PM2016-07-29T20:07:01+5:302016-07-29T20:07:01+5:30
२३ वर्षीय विवाहित महिलेस माहेरहुन पैशाची मागणी करून जन्मलेल्या मुलीस जिवे ठार मारून टाक म्हणून बेदम मारहाण करणाऱ्या सहा जणांविरूध्द वैराग पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. २९ - वैराग , तांबेवाडी (ता़ बार्शी) येथील २३ वर्षीय विवाहित महिलेस माहेरहुन पैशाची मागणी करून जन्मलेल्या मुलीस जिवे ठार मारून टाक म्हणून बेदम मारहाण करणाऱ्या सहा जणांविरूध्द वैराग पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
याबाबत वैराग पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, तांबेवाडी (ता़ बार्शी) येथील शिवानंद चव्हाण यांचा विवाह कोंडी (ता़ उ़ सोलापूर) येथील राजश्री हिच्याशी १० मे २०१३ रोजी झाला होता़ राजश्री हिस मुलबाळ होत नव्हते़ काही वर्षानंतर राजश्री हिस मुलगी झाली़ मात्र घरच्यांना मुलगा हवा होता़
जन्मलेल्या मुलीस जिवे ठार मार व ट्रक्टरचा हप्ता भरण्यासाठी ७० हजार रूपये घेवून ये या कारणावरून पती शिवानंद ताराचंद चव्हाण, सासरा ताराचंद हिरा चव्हाण, सासू कमलाबाई चव्हाण, दिर दयानंद चव्हाण, जाऊ बायडा चव्हाण, मनिषा चव्हाण या सहा जणांनी मिळून जबर मारहाण करून उपाशी ठेवले़ याप्र्रकरणी राजश्री शिवानंद चव्हाण हिने दिलेल्या फिर्यादीवरून पतीसह सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पुढील तपास पोलीस नाईक दयानंद हेबाडे हे करीत आहेत़