सहा महिन्यात रस्त्याचे वाजले १२

By Admin | Published: November 3, 2016 03:19 AM2016-11-03T03:19:27+5:302016-11-03T03:19:27+5:30

१३ लाख ५७ हजार ५ रुपये किमतीचा रस्ता अवघ्या सहा महिन्यातच उखडला असून भ्रष्टाचाराचे एक मूर्तिमंत उदाहरण ठरला आहे.

Six months on the road, 12 | सहा महिन्यात रस्त्याचे वाजले १२

सहा महिन्यात रस्त्याचे वाजले १२

googlenewsNext

हितेन नाईक/निखिल मेस्त्री,

पालघर- नगर परिषदेतील एकता नगर येथे ठेकेदार डिजी पाटील यांनी तयार केलेला १३ लाख ५७ हजार ५ रुपये किमतीचा रस्ता अवघ्या सहा महिन्यातच उखडला असून भ्रष्टाचाराचे एक मूर्तिमंत उदाहरण ठरला आहे. त्यामुळे ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी केली जात आहे.
नंडोरे येथील एकता नगर येथील सहा महिन्यांपूर्वी बांधलेल्या रस्त्याची झालेली चाळण व गटाराची झालेली दुरावस्था ही या निकृष्ट कामाचे उत्कृष्ट उदाहरण आहे. या कामासाठी १३ लाख ५७ हजार ५ रुपयांचा ठेका डी. जी. पाटील या ठेकेदारास देण्यात आला. त्याची मुदत सहा महिने होती. मात्र काहीच महिन्यांनी या नवीन रस्त्यासाठी वापरलेला सिमेंट निघून सर्व खडी बाहेर पडली असून रस्त्यात मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे नागरीक ठेकेदार व नगरपरिषदेच्या नावाने बोटे मोडत आहेत. थोड्या दिवसांपूर्वी सुमारे १५ लाख रु पये खर्चून चकाचक दिसणारा हा रस्ताही टक्केवारीच्या प्रवाहात वाहून गेल्याचा आरोप येथे होत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Six months on the road, 12

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.