आरे-वारे समुद्रात सहा जण बुडाले, महिला बचावली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2018 08:14 PM2018-06-03T20:14:49+5:302018-06-03T20:14:49+5:30

रत्नागिरी-गणपतीपुळे मार्गावर असलेल्या आरे वारे येथील समुद्रात पोहण्यासाठी गेलेल्या सहा जणांपैकी एक महिला बचावली असून, पाच जणांचे मृतदेह सायंकाळी उशिरा सापडले तर एक बेपत्ता आहे.

Six people lost their lives in the sea, women survived | आरे-वारे समुद्रात सहा जण बुडाले, महिला बचावली

आरे-वारे समुद्रात सहा जण बुडाले, महिला बचावली

Next

रत्नागिरी : रत्नागिरी-गणपतीपुळे मार्गावर असलेल्या आरे वारे येथील समुद्रात पोहण्यासाठी गेलेल्या सहा जणांपैकी एक महिला बचावली असून, पाच जणांचे मृतदेह सायंकाळी उशिरा सापडले तर एक बेपत्ता आहे. हे सर्वजण बोरिवली (मुंबई) येथील राहणारे आहेत. घटना रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील दोन महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे.

रेंचर डिसुजा (१९), मॅथ्यू डिसुजा (१८), केनेथ डिसुजा (५४), मोनिका डिसुजा (४४), सनोमी डिसुजा (२२, सर्व मेधा कॉलनी, हॉलीक्रॉस रोड, शुभजीवन सर्कल, बोरिवली पश्चिम) अशी मृतांची नावे आहेत. रिटा डिसुजा (७०) यांना वाचवण्यात यश आले आहे. जिल्ह्यातील पर्यटन हंगाम अंतिम टप्प्यात आला असताना घडलेल्या या दुर्घटनेने हंगामाला गालबोट लागले आहे.

बोरिवली येथील डिसुजा कुटुंबिय सायंकाळच्या सुमारास आरेवारे येथील समुद्रात स्नानासाठी उतरले होते. मात्र त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने आणि पाण्याचा वेगही जास्त असल्याने लाटांबरोबर ते समुद्रात ओढले जाऊ लागले. त्यापैकी एक महिला लाटांचा तडाखा बसल्याने समुद्रातून बाहेर आली, त्यामुळे बचावली तर अन्य पाचजण समुद्रात गटांगळ्या खावू लागले.

दरम्यान, याबाबतची माहिती नजीकच्या ग्रामस्थांनी पोलिसांना कळवल्यानंतर पोलिसांनी तात्काळ आरे-वारे येथे धाव घेतली. पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने शोध सुरु केला. त्यानंतर नजीकच्या परिसरातच काही मिनिटांच्या अंतराने हे मृतदेह सापडले.


चौकट

फाजील आत्मविश्वास

दोन दिवस बरसलेल्या पावसामुळे समुद्र खवळलेला होता. डिसुजा कुटुंबिय समुद्रात उतरत असल्याचे पाहून स्थानिक ग्रामस्थांनी त्यांना समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला होता. मात्र तरीही हे सारेजण पाण्यात उतरले अन् ही दुर्घटना घडली.

Web Title: Six people lost their lives in the sea, women survived

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.