सहावीच्या आदिवासी विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

By admin | Published: October 3, 2016 09:28 PM2016-10-03T21:28:27+5:302016-10-03T21:28:27+5:30

तलासरी येथील ठक्कर बाप्पा विद्यालयाच्या अनुदानित आश्रम शाळेतील इयत्ता सहावीत शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्याने सकाळी आश्रम

Sixth tribal student suicidal attempt | सहावीच्या आदिवासी विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

सहावीच्या आदिवासी विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

Next
>
सुरेश काटे/ऑनलाइन लोकमत
 
पालघर, दि .3 - तलासरी येथील ठक्कर बाप्पा विद्यालयाच्या अनुदानित आश्रम शाळेतील इयत्ता सहावीत शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्याने सकाळी आश्रम शाळेच्या बाथरूम मध्ये गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयन्त केला परंतु इतर मुलाच्या व शिक्षकांच्या प्रसंग सावधनतेमुळे या मुलाचे प्राण वाचले.

ठक्कर बाप्पा शाळेच्या अनुदानित आश्रम शाळेतील इयत्ता सहावीत शिकणारा आदिवासी विध्यार्थी प्रदीप कृष्णा पऱ्हाड  वय 14 वर्षे  रा. कासा साये याने हा सकाळी सात वाजता अंघोळीस गेला व बाथरूम मधील नायलॉन दोरीने गळफास घ्यायचा प्रयन्त केला अंघोळीस गेलेला प्रदीप अजून बाहेर कसा येत नाही म्हणून इतर विद्यार्थ्यांनी आत पहिले असता तो गळ्यात दोरी अडकलेली दिसलि तेव्हा मुलांनी आरडा ओरड केली असता मुले शिक्षक धावले व गळ्यातील दोरी काढून त्याला तलासरी ग्रामिण रुग्णालयात दाखल केले त्यामुळे त्याचे प्राण वाचले .

प्रदीप हा इयत्ता पहिली पासून ठक्कर बाप्पाच्या आश्रम शाळेत शिकत आहे परंतु  अभ्यासात कमजोर आहे  त्यामुळे कदाचित अभ्यासातील उदासीनतेमुळे आत्महत्येचा प्रयन्त केला असावा या बाबत आश्रम शाळेचे मुख्याध्यापक बाविस्कर यांनी तलासरी पोलिसात तक्रार दाखल केली. प्रदीपचे वडील कृष्णा पऱ्हाड यांनी प्रदीप हा घरी अभ्यास करीत नाही एकसारखे पैसे मागतो उनाडग्या करतो असे पोलिसांना सांगितले. 
 
 

Web Title: Sixth tribal student suicidal attempt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.