प्रत्येक एमआयडीसीमध्ये कौशल्य विकास मंडळ
By admin | Published: March 25, 2017 12:27 AM2017-03-25T00:27:09+5:302017-03-25T00:27:09+5:30
राज्याच्या प्रत्येक औद्योगिक विकास महामंडळ क्षेत्रात एक कौशल्य विकास मंडळ असावे यापद्धतीने नियोजन करण्यात आले आहे
मुंबई : राज्याच्या प्रत्येक औद्योगिक विकास महामंडळ क्षेत्रात एक कौशल्य विकास मंडळ असावे यापद्धतीने नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
भाजपाचे अतुल भातखळकर यांनी खालापूर तालुक्यातील भूसंपादनाबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर देसाई म्हणाले की, खालापूर टाकुलीतील १२ गावांमधील १ हजार १५० हेक्टर जमीन औद्योगिक वसाहतीसाठी प्रस्तावित केलेली आहे. तेथे येण्याची तयारी अनेक उद्योगांनी दाखविली आहे. तेथे वाटाघाटी करून जमिनीचे दर निश्चित केले जातील.चर्चेत सदस्य आशिष शेलार, योगेश सागर आदींनी भाग घेतला.
वीज तारा देखभालीसाठी डीपीसीने निधी द्यावा महावितरण कंपनीमार्फत नुकसान भरपाई देण्यासंदर्भातील प्रक्रि या आता आॅनलाईन करण्यात येत आहे. राज्यातील वीजेच्या तारांची देखभाल दुरु स्ती करण्यासाठी ५ हजार ५०० कोटी रु पयांची आवश्यकता असून राज्य शासन व जिल्हा विकास नियोजन निधीतून ही रक्कम उपलब्ध व्हावी यासाठी पालकमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा, असे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत सांगितले.
सावरडे, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी येथे वीजेची तार गळ्यात अडकून दुचाकीस्वाराच्या झालेल्या मृत्यूबाबत सदस्य सदानंद चव्हाण यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर बावनकुळे म्हणाले की, ही घटना दुर्दैवी आहे. मृत्यूमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराच्या कुटुंबाला महावितरणमार्फत चार लाख रु पयांचे अर्थसहाय्य करण्यात आले आहे. या वीजेच्या तारेसंदर्भात कारवाई करण्याबाबत संबंधित लाईनमनला निर्देश देण्यात आले होते. मात्र त्याने योग्य वेळी कार्यवाही न केल्याने त्याला निलंबित करण्यात आले आहे. येत्या १५ दिवसांत मुख्य विद्युत निरीक्षकाच्या माध्यमातून या घटनेची अंतिम चौकशी करु न कारवाई करण्यात येईल.
विनावापर २ हजार भूखंड ताब्यात-
राज्यात औद्योगिकीकरणासाठी देण्यात आलेले मात्र विनावापर असलेले दोन हजार भूखंड ताब्यात घेण्यात आले आहेत. त्यांचे पुनर्वाटपाची प्रक्रि या सुरु झाली असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी विधानसभेत दिली.
सिंधुदूर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील उद्योग उभारणीसाठी वितरीत केलेले भूखंड विनावापर पडून असल्याबाबत सदस्य सुनील प्रभू यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना श्री. देसाई म्हणाले की, या दोन जिल्ह्यात २६५१ भूखंडांपैकी २४९५ भूखंडांचे औद्योगिक वापरासाठी वितरण करण्यात आले. मात्र यातील सुमारे ११० भूखंड विनावापर पडल्याचे आढळून आले. ते ताब्यात घेण्यात आले. (विशेष प्रतिनिधी)