सोने लुटण्याचा दिन..

By admin | Published: October 3, 2014 12:29 AM2014-10-03T00:29:14+5:302014-10-03T00:29:14+5:30

वरतंतू नावाचे एक गुरू होते. ते आपल्या आश्रमात शिष्यांना ज्ञानदान करत असत. अनेक शिष्य त्यांच्याकडून वेद आणि शास्त्रचा अभ्यास करत असत.

Sleeping day .. | सोने लुटण्याचा दिन..

सोने लुटण्याचा दिन..

Next
>वरतंतू नावाचे एक गुरू होते. ते आपल्या आश्रमात शिष्यांना ज्ञानदान करत असत. अनेक शिष्य त्यांच्याकडून वेद आणि शास्त्रचा अभ्यास करत असत. एकादा असेच वरतंतू यांच्याकडे त्यांच्या एका कौत्स नामक शिष्याने त्यांना विचारले की,  ‘तुम्ही आम्हाला एवढे ज्ञान दिले. त्याच्या मोबदल्यात तुम्हाला काय गुरु दक्षिणा द्यावी.’ यावर गुरु वरतंतू म्हणाले की,  ‘कौत्स, ज्ञान हे दान करायचे असते. त्याचा कधीच सौदा करावयाचा नसतो. तुम्हाला ज्ञान मिळाले यातच माझी गुरुदक्षिणा आली.’ मात्र कौत्साचे समाधान झाले नाही.  ‘मी काय गुरु दक्षिणा देवू..’ असे तो विचारु लागला.
गुरु यावर म्हणाले,  ‘मी तुला चौदा विद्यांचे शिक्षण दिले म्हणून तु मला चौदा कोटी सुवर्ण मोहरा दे.’ कौत्स याला वाटले की आपण सहज एवढया मोहरा कमवू. परंतू त्याला ते जमले नाही. कौत्स यावर रघुराजाकडे गेला. त्याने त्यांच्याकडे मोहरांची मागणी केली. पण राजाने त्यापूर्वीच आपली सगळी संपत्ती दान केली होती. पण आता कौत्सला रिकम्या हाताने परत कसे पाठावयाचे म्हणून त्याने त्याला तीन दिवसांनी येण्यास सांगितले. शिवाय राजानेही कुबेराकडे वसुलीसाठी निरोप धाडला. पण धन काही येईना. मग राजाने अखेर युद्धाची तयारी केली. आणि ही युद्धाची बातमी इंद्र देवाला कळाली. इंद्राने यावर कुबेराला राजाच्या नगरीच्या वेशीवर जी आपटयाची वृक्ष आहेत; त्यावर सुवर्णमुद्रांचा पाऊस पाडण्याची आज्ञा दिली. दुस:या दिवशी राजाने तेथे सुवर्णमुद्रांचा ढिग जमा झाल्याचे पाहिले आणि कौत्साला ते धन घेण्यास सांगितले. त्यानेही गुरुदक्षिणोएवढेच धन घेतले. आणि राजाने उर्वरित मुद्रा प्रजेला वाटल्या. प्रजेला ज्या दिवशी आपटयाच्या झाडाखाली जे धन मिळाले तो दिवस दस:याचा होता. त्याची आठवण म्हणून आपटयाच्या पानाला त्या दिवशी सोने म्हणून देतात आणि घेतात. शिवाय या दिवशी शस्त्रंची पूजा देखील केली जाते.
देवीने महिषासुराशी युद्ध केले आणि त्याला मारले तो दिवस म्हणजे दसरा. प्रभू रामाने रावणाचा वध केला तो दिवस म्हणजे दसरा. राजपूत असोत वा मराठे असोत; या वीरांनी युद्ध मोहीमांना प्रारंभ केला तो दिवस म्हणजे दसरा. दस:याची दुसरी ओळख म्हणजे विजयादशमी अशी आहे. अज्ञानाने ज्ञानावर, पराक्रमाने शत्रुवर आणि वै:यावर प्रेमाने विजय मिळविण्याचा दिवस म्हणजे दसरा. साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणून दस:याला स्थान आहे. या मुहूर्तावर नवी खरेदी, नवे करार शिवाय नव्या योजनांचा आरंभ केला जातो. शिवाय सायंकाळी आपटयाची पाने सोने म्हणून लहानग्यांकडून मोठयांना दिली जातात. थोरामोठयांना त्यांचा मान दिला जातो. त्यांच्या पाया पडले जाते ते यादिवशी. पुढील आयुष्यात यशस्वी होण्यासाठी त्यांचे आशीवार्द घेतले जातात ते दस:यादिवशी. म्हणून दस:याला फार मोठे महत्व आहे.
 
दसरा या शब्दाचा अर्थ दहावा दिवस असा आहे. नवरात्रदरम्यान घटाच्या आजूबाजूला पेरलेले धान्य उपटून देवीसह सह इतर देवांना वाहतात. शिवाय गवळी किंवा इतर समाजाचे लोक या दिवशी कालिया नागावर बसलेल्या कृष्णाची पूजा करतात. त्याला शिलांगणाचा उत्सव असेही म्हटले जाते. शिलांगणाच्या पागोटय़ामध्ये धान्याच्या रोपांचा ङोंडा लावला जातो. शिलांगण हा सीमोल्लंघन हा शब्दाचा अपभ्रंश आहे. या दिवशी शमीची पूजा केली जाते. शिवाय त्यानंतर शमीची फांदी तोडून तिची पाने, तिळाच्या झाडाची फुले, बाजारीची पाने आणि आपटयाची पाने श्रीगणोशाला अर्पण केली जातात. आणि त्यानंतर ही पाने गावाबाहेर नेली जातात व लुटली जातात; यालाच सीमोल्लंघन असे म्हणतात.
 
सचिन लुंगसे

Web Title: Sleeping day ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.