स्लेंडर लॉरीस जाणार कोल्हापूरला

By admin | Published: June 26, 2015 02:57 AM2015-06-26T02:57:18+5:302015-06-26T02:57:18+5:30

जगातील दुर्मिळ अशा ‘स्लेंडर लॉरीस’ माकडाची टॅक्सीडर्मी तयार करण्यात आली असून आता ती कोल्हापूर येथील चंदगड वनविभागाकडे पाठविण्यात येणार आहे.

Slender Lawrence to Kolhapur | स्लेंडर लॉरीस जाणार कोल्हापूरला

स्लेंडर लॉरीस जाणार कोल्हापूरला

Next

मुंबई : जगातील दुर्मिळ अशा ‘स्लेंडर लॉरीस’ माकडाची टॅक्सीडर्मी तयार करण्यात आली असून आता ती कोल्हापूर येथील
चंदगड वनविभागाकडे पाठविण्यात येणार आहे.
डिसेंबर २०१४ मध्ये कोल्हापूर ठाण्यातील तस्करी प्रकरणात एकूण चार माकडे मिळाली होती. यापैकी तीन माकडांना जंगलात सोडण्यात आले. एका माकडाची प्रकृती गंभीर होती. दरम्यानच्या काळात ती अधिक खालावून त्याचा मृत्यू झाला, असे टॅक्सीडर्मिस्ट डॉ. संतोष गायकवाड यांनी सांगितले.
संजय गांधी राष्ट्रीत उद्यानातील टॅक्सीडर्मी सेंटर येथे या माकडाची टॅक्सीडर्मी करण्यात असून ती चंदगड वनविभागाच्या उद्भवन केंद्रात ठेवण्यात येणार आहे. विद्यार्थी, संशोधक आणि निसर्गप्रेमींना या टॅक्सीडर्मीच्या सहाय्याने माकडाचा अभ्यास करणे सुलभ जाणार आहे, असे डॉ. गायकवाड म्हणाले.

Web Title: Slender Lawrence to Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.