पुन्हा घुमला ‘टोल देणार नाही’चा नारा
By admin | Published: June 10, 2014 01:33 AM2014-06-10T01:33:44+5:302014-06-10T01:33:44+5:30
जल्लोषी वातावरणात आज, सोमवारी कोल्हापूरकरांनी रस्त्यावर उतरून ‘टोल देणार नाहीच’, असे पुन्हा एकदा ठणकावून सांगितले.
Next
>कोल्हापूर : टोलविरोधी घोषणांचा अखंड गजर, हालगी व झांजपथकाचा दणदणाट, गळ्यात पक्षांचे स्कार्फ व हातात ङोंडा घेतलेले कार्यकर्ते, अशा जल्लोषी वातावरणात आज, सोमवारी कोल्हापूरकरांनी रस्त्यावर उतरून ‘टोल देणार नाहीच’, असे पुन्हा एकदा ठणकावून सांगितले. टोलच्या निषेधार्थ निघालेल्या तिस:या महामोर्चात जिल्ह्याच्या कानाकोप:यातून हजारो कार्यकर्ते सहभागी झाले.
गेली दोन वर्षे आंदोलन सुरू असताना, या प्रश्नाकडे लक्ष देण्यास मुख्यमंत्र्यांना वेळ नसेल तर आम्हालाही चर्चा करण्याची गरज नाही. लोकसभेच्या निवडणुकीनंतर अजूनही ही मंडळी शुद्धीवर येत नसतील अशा मुजोर राज्यकत्र्याना जनतेची ताकद दाखवा, असे आवाहन प्रा. एन.डी. पाटील यांनी टोलविरोधी महामोर्चाच्या सांगता प्रसंगी केले.
कामगारमंत्री हसन मुश्रीफ, गृहराज्यमंत्री सतेज पाटील या मंत्र्यांचे कार्यकर्ते या मोर्चात पुढे होते. ‘टोल सुरू करण्याचे प्रयत्न यापूर्वी झाले. पुन्हा कराल तर याद राखा. टोल तर देणार नाहीच, टोले मात्र जरूर देऊ’, असा इशाराच महामोर्चाद्वारे देण्यात आला.(प्रतिनिधी)
च् टोलविरोधातील या महामोर्चात पूर्वीप्रमाणोच पक्षीय मतभेद बाजूला ठेवून सर्वच राजकीय कार्यकर्ते खांद्याला खांदा लावून रस्त्यावर उतरले. पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे रस्त्यांना पोलीस छावणीचे स्वरूप आले. सकाळपासून बंद असलेले सर्व व्यवहार दुपारनंतर सुरळीत झाले. दुपारी पाऊणच्या सुमारास गांधी मैदानातून महामोर्चाला प्रचंड जल्लोषात सुरुवात झाली. सव्वादोनच्या सुमारास जिल्हाधिकारी राजाराम माने व पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांना शिष्टमंडळाने निवेदन दिले.