मराठीला लागलीय गळती
By Admin | Published: August 10, 2016 01:50 AM2016-08-10T01:50:20+5:302016-08-10T01:50:20+5:30
मराठी भाषेचे अस्तित्व अबाधित राखण्यासाठी विविध उपक्रमांना प्राधान्य देणाऱ्या, अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, म्हणून प्रयत्न करणाऱ्या आणि आगामी २५ वर्षांसाठी भाषेचे धोरण
पुणे : मराठी भाषेचे अस्तित्व अबाधित राखण्यासाठी विविध उपक्रमांना प्राधान्य देणाऱ्या, अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, म्हणून प्रयत्न करणाऱ्या आणि आगामी २५ वर्षांसाठी भाषेचे धोरण तयार करण्याच्या घोषणा देणाऱ्या राज्य शासनाचे राज्यातील ‘मराठी’कडे दुर्लक्ष होत आहे. मराठीमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आलेल्या अपयशामुळे राज्यात दरवर्षी ७ ते १४ टक्के इतक्या मोठ्या प्रमाणात ‘मराठी’ला गळती लागली असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. ‘मराठी’ची धुरा ज्या युवा पिढीच्या हाती सोपवायची, तीच पिढी ‘मराठी’पासून दुरावत चालल्याने महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये मराठी विभाग बंद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पुण्यातील महाविद्यालयांमध्ये अनेक वर्षे मराठीचे अध्यापन करणाऱ्या डॉ. राजेंद्र थोरात यांनी राज्यातील महाविद्यालयीन स्तरावरील मराठीच्या स्थितीबाबत केलेल्या सर्वेक्षणातून मराठी भाषेच्या विद्यार्थी गळतीची ही धक्कादायक बाब समोर आली आहे. गेल्या पाच वर्षांत डॉ. थोरात यांनी वैयक्तिक संपर्क, सोशल मीडिया व अन्य संपर्कसाधनांचा वापर करून राज्यभरातील मराठी भाषेचे महाविद्यालयीन पातळीवरचे विद्यार्थी, त्यांची संख्या, वर्ग, शिक्षक, संशोधन, भाषाविषयक उच्च शिक्षण आदी विविध मुद्यांवर युवा पिढीशी संवाद साधला, तसेच महाविद्यालयीन पातळीवर उपलब्ध आकडेवारीची तपासणी केली, त्यातून दरवर्षी मराठी भाषेचे सुमारे ७०० ते १४०० विद्यार्थी कमी होत असल्याचा निष्कर्ष समोर आला आहे. ओतूर, नारायणगाव येथील महाविद्यालयांमधील मराठी विभाग बंद पडले आहेत. दरवर्षी
विद्यार्थीसंख्येचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटत आहे ही चिंतेची बाब आहे, या गोष्टी पाहायला मिळाल्या आहेत. अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या प्रयत्नात मराठीच्या सद्य:स्थितीकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याची वस्तुस्थिती यानिमित्ताने समोर आली आहे. े(प्रतिनिधी)