मंदीचे सावट
By admin | Published: July 10, 2015 04:04 AM2015-07-10T04:04:45+5:302015-07-10T04:04:45+5:30
२०१४ या वर्षामध्ये जागतिक अर्थव्यवस्थेच्या विकासाचा वेग मंदावला होता; परंतु, सध्याची जागतिक स्थिती आणि त्यातील घडामोडी लक्षात घेता २०१५मध्ये हा
Next
आयएमएफचे विश्लेषण
मुंबई : २०१४ या वर्षामध्ये जागतिक अर्थव्यवस्थेच्या विकासाचा वेग मंदावला होता; परंतु, सध्याची जागतिक स्थिती आणि त्यातील घडामोडी लक्षात घेता २०१५मध्ये हा वेग आणखी मंदावण्याची चिन्हे असून, मंदीची सावली अनेक देशांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने व्यक्त केली आहे. परंतु, समाधानाची बाब म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेचे मूलभूत घटक मजबूत असून, चालू वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास साडे सात टक्के दराने होईल याचा पुनरुच्चार आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने केला.