पुणे जिल्ह्यातील लहान-मोठी २५ धरणं रिकामी

By admin | Published: May 15, 2016 07:37 PM2016-05-15T19:37:32+5:302016-05-15T21:03:13+5:30

पुणे जिल्ह्यात लहान-मोठी २५ धरणं असून, ती रिकामी होत आहेत. मे अखेरपर्यंत साठा कसाबसा पुरेल अशी परिस्थिती असून, जूनमध्ये जर पहिल्या आठवड्यात पाऊस पडला नाही तर पाणीटंचाई अधिक गंभीर होणार आहे.

Small and large 25 dams in Pune district are empty | पुणे जिल्ह्यातील लहान-मोठी २५ धरणं रिकामी

पुणे जिल्ह्यातील लहान-मोठी २५ धरणं रिकामी

Next

ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. १५ : पुणे जिल्ह्यात लहान-मोठी २५ धरणं असून, ती रिकामी होत आहेत. मे अखेरपर्यंत साठा कसाबसा पुरेल अशी परिस्थिती असून, जूनमध्ये जर पहिल्या आठवड्यात पाऊस पडला नाही तर पाणीटंचाई अधिक गंभीर होणार आहे. २५ पैकी बहुतांश धरणातील साठा हा वजा झाला असून, यात पिंपळगाव जोगा, माणिकडोह, घोड, नाझरे व उजनीचा समावेश आहे.  

 
कुकडी : अनेक वर्षांत प्रथमच नीचांकी साठा
नारायणगाव : कुकडी प्रकल्पांतर्गत असलेल्या जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील पाच धरणांमध्ये अवघे २.०३ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. अनेक वर्षांमध्ये प्रथमच डिंभे धरणात फक्त ४१ दलघफू तर  माणिकडोह ० टक्के असा नीचांकी पाणीसाठा राहिला आहे. जर मॉन्सून सक्रिय न झाल्यास पाण्याची बिकट परिस्थिती निर्माण होणार असून, त्याचा फटका पुणे, नगर जिल्ह्यांतील सहा तालुक्यांना बसणार आहे.
कुकडी प्रकल्पांतर्गत असलेल्या ५ धरणांच्या पाणीसाठ्यावर जुन्नर, आंबेगाव, पारनेर, श्रीगोंदा, करमाळा, कर्जत हे तालुके अवलंबून आहेत. गेल्या महिन्यात पारनेर, श्रीगोंदा, करमाळा, कर्जत या तालुक्यांकरिता २.३ टीएमसी पाणी सोडण्यात आले होते. ते आवर्तन बंद करण्यात आले असून, पुढील दोन महिन्यांचे नियोजन राहील. हे पाणी पिण्यासाठी राहील तसेच या पाण्यावर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही सुटणार आहे, असे कुकडी पाटबंधारे विभाग क्र. १चे कार्यकारी अभियंता जी. बी. नन्नोर यांनी सांगितले. 

नीरा देवघर, भाटघर धरणे आटली
भोर : तालुक्यातील नीरा देवघर धरणात फक्त ४ टक्के, तर भाटघर धरणात ९ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षीच्या तुलनेत अत्यंत कमी पाणीसाठा राहिला आहे. धरणातील विद्युतनिर्मितीसाठी व पाईपलाईनची देखभाल व दुरुस्तीसाठी धरणातून सुरू असलेला पाणीपुरवठा पाच दिवस बंद राहणार असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.  मागील चार महिन्यांपासून भाटघर धरणातून ७५० क्युसेक्सने, तर सध्या ३३५ क्युसेक्सने पाणी खाली सोडले आहे. धरण ९ टक्क्यांवर आले आहे. पुढील दोन-तीन दिवस पाणी बंद केले जाणार आहे. 

चासकमान झपाट्याने खाली...
चासकमान : धरणाच्या हुतात्मा राजगुरू जलाशयात ९.७८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. शिरूर व खेड तालुक्यांसाठी १४ दिवसांचे पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सुरू आहे. धरणातील जलाशयातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत आहे.  सध्या धरणात पाणीपातळी ६३२.२३ दलघमी, एकूण साठा ४८.१७ दलघमी, उपयुक्त साठा २०.९८ दलघमी असून, ९.७८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. कालव्याला सोडलेल्या आवर्तनामुळे आजूबाजूच्या परिसरातील विहिरींची पाणीपातळी वाढली असून, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कमी झाला आहे.
आसखेड : भामा-आसखेड धरणात २२.१४ टक्के पाणीसाठा असून, गेल्या दोन दिवसांत पाच मिलिमीटर पाऊस धरणक्षेत्रात पडला आहे.                    
पाण्याची पातळी ६५६.१० मीटर असून, एकूण साठा ६१.५९७ दलघमी  व  उपयुक्त साठा  ४८.०७५ दलघमी तर वर्षभरात एकूण १००५ मिलिमीटर पाऊस धरण परिसरात झाला.
घोड खोरे
धरण          पाणीसाठा(%)
पिंपळगाव        -७३.८७
माणिकडोह        -0.१५
येडगाव             १७.९८
वडज        ६.५२
डिंभे       0.३३
घोड       - १0.३२
विसापूर        ९.९२

भीमाखोरे
धरण          पाणीसाठा(%)
कळमोडी       २0.७९
चासकमान       ९.७८
भामा आसखेड      २२.४४
वडिवळे       ३५.९७
अंद्रा      ५८.७६

मुळा-मुठा खोरे
धरण          पाणीसाठा(%)
पवना        २१.५८
कासारसाई      २९.0२
मुळशी         १२.२३
टेमघर       ४.१८
वरसगाव      ५.१२
पानशेत      १८.१८
खडकवासला    ६४.७४

नीरा खोरे
धरण          पाणीसाठा(%)
गुंजवणी     ८.५८
नीरा देवघर     ३.९८
भाटघर        ९.२९
वीर      ५.७१
नाझरे      - १३.९५

उजनी    - ४८.0१

Web Title: Small and large 25 dams in Pune district are empty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.