एसटीच्या प्रवासभाडय़ात अत्यल्प वाढ

By Admin | Published: July 27, 2014 02:07 AM2014-07-27T02:07:27+5:302014-07-27T02:07:27+5:30

डिङोल दरवाढीमुळे राज्य परिवहन महामंडळाने सर्व प्रवासी वाहतूक सेवांच्या प्रवास भाडय़ात 31 जुलैपासून किरकोळ वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

A small increase in the passenger fares of the ST | एसटीच्या प्रवासभाडय़ात अत्यल्प वाढ

एसटीच्या प्रवासभाडय़ात अत्यल्प वाढ

googlenewsNext
मुंबई : शासनाने मंजूर केलेल्या  ‘आपोआप भाडेवाढ सूत्रत’ अंतर्भूत असणा:या डिङोल दरवाढीमुळे राज्य परिवहन महामंडळाने सर्व प्रवासी वाहतूक सेवांच्या प्रवास भाडय़ात 31 जुलैपासून किरकोळ वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
ही भाडेवाढ सरासरी क्.81 टक्के एवढी असून, त्यामुळे साध्या/जलद आणि रात्र सेवेत प्रति सहा किमीसाठी 5 पैसे, निमआराम सेवेत प्रति सहा किमीसाठी 1क् पैसे अशी अत्यल्प वाढ होणार आहे. एसटी महामंडळाकडून मिळालेल्या माहितीनुसार, साध्या/जलद सेवेच्या पहिल्या 3क् किमीच्या प्रवासासाठी वाढ केलेली नाही. आणि 31 ते 15क् किमीसाठी 1 रुपया एवढी वाढ केली आहे. शहरी सेवेच्या पहिल्या 16 किमी प्रवासासाठी 1 रुपया वाढ केली असून, त्यापुढील प्रवासासाठी वाढ केलेली नाही. 31 जुलैपूर्वी आगाऊ आरक्षण केलेल्या आणि 31 जुलै रोजी अथवा त्यानंतर प्रवास सुरू करणा:या प्रवाशांकडून प्रवासादरम्यान फरक वसूल केला जाणार आहे. मात्र ज्या प्रवाशांचा प्रवास 3क् जुलै रौजी सुरु होऊन 31 जुलै किंवा त्यानंतर संपणार असेल अशा प्रवाशांकडून फरक वसूल केला जाणार नाही. (प्रतिनिधी)
 
प्रकारसध्याचा नवीन 
साधी/जलद6.2क्6.25
रात्रसेवा7.357.4क्
हिरकणी8.458.55
 
प्रकारसध्याचा नवीन 
शीतल11.4क्11.5क्
शिवनेरी(एसी)15.5515.7क्
शिवनेरी(स्लिपर)15.7क्15.85

 

Web Title: A small increase in the passenger fares of the ST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.