स्मॉल इज वंडरफुल
By admin | Published: May 3, 2015 12:19 AM2015-05-03T00:19:04+5:302015-05-03T00:19:04+5:30
कॉम्प्युटरचा आकार दिवसेंदिवस कमी होत असताना भारतीय टेकसॅव्ही लोकांमध्ये आता मिनी पीसीचा ट्रेंड वेगाने विकसित होत आहे.
तुषार भामरे
कॉम्प्युटरचा आकार दिवसेंदिवस कमी होत असताना भारतीय टेकसॅव्ही लोकांमध्ये आता मिनी पीसीचा ट्रेंड वेगाने विकसित होत आहे. आॅफीस किंवा घरी असताना कामासोबतच व्हिडीओज, म्युझिक आणि गेमिंगचा आनंद घेण्यासाठी सोयीस्कर आकाराच्या व क्षमतेच्या पीसीलाच पसंती मिळते. अशावेळी वापरकर्त्याला उत्तम दर्जाचे व्हिडीओ, आॅडिओ, कमीत कमी विजेचा वापर, पुरेसे कूलिंग आणि मशिनचा कमीत कमी आवाज हवा असतो. शिवाय दर्जाबाबत तडजोड न करता स्टायलिश लूक आणि छोटा आकारही हवा असतो. ‘लिवा एक्स’ने हे प्रत्यक्षात आणलं आहे. भारतात अमेझॉन व फ्लिपकार्टवर हा मिनी पीसी आता उपलब्ध झालाय.
आवाज न करणारे
थर्मल डिझाइन
लिवा एक्समध्ये आवाजाची निर्मिती न होऊ देणारे थर्मल डिझाइन आहे. तसेच इंटेलच्या नव्या बे-ट्रेल-एम एसओसी २२ एनएम प्रोसेसरमुळे मिनी पीसी शांतपणे एन्जॉय करता येतो. लिवा एक्समध्ये विजेचा अतिशय कमी वापर होतो, जो पारंपरिक डेस्कटॉपच्या तुलनेत एकदशांशाने कमी आहे.
कुठेही फिट करा : ६४ बिट ड्युएल कोअर २.२५ जीएचझेड मशिन, ४ जीबी डीडीआर, ३,६४ जीबी ईएमएमसी, वाय-फाय, ब्लूटुथ, यूएसबी ३.० आणि एमसाटा हार्डडिस्क असं उत्तम कन्फिगरेशन असलं तरीही याचा आकार कॉम्प्युटर माउसपेक्षाही लहान आहे. नेटिव्ह व्हेसा माउंटमध्ये तुम्ही तुमचा लिवा एक्स अक्षरश: डिस्प्ले, मॉनिटर, टीव्ही इत्यादी कशाच्याही मागे कुठेही ठेवू शकता. यामुळे फक्त जागाच वाचते असे नाही, तर केबलमुक्त वातावरण तयार करायला मदत होते.
ग्राहकांना विविध आकार आणि फॉर्मॅटबाबतीत सर्वोत्तम कॉम्प्युटिंग तंत्रज्ञान देण्यावर इंटेल कायम भर देत आलंय. यामुळे देशभरातील विशेषत: दुर्गम भागातील लोकांना हे सहज वापरता येऊ शकेल.