तर छोटे घटक पक्ष एकत्रित येऊन निवडणूक लढवणार
By admin | Published: January 18, 2017 06:49 PM2017-01-18T18:49:47+5:302017-01-18T18:49:47+5:30
आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महायुतीने स्थान न दिल्यास छोटे घटक पक्ष एकत्रित येऊन निवडणूक लढवतील
Next
>ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 18- आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महायुतीने स्थान न दिल्यास छोटे घटक पक्ष एकत्रित येऊन निवडणूक लढवतील, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी आणि शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांनी आज दुपारी नाशिक येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिव संग्राम आणि राष्ट्रीय समाज पक्ष यांच्या मदतीने भाजपाने निवडणूक लढविली होती. आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसंदर्भात महायुती समन्वय समितीची बैठक तातडीने बोलवावी अशी मागणी मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे. परंतू अद्याप बैठक झालेली नाही तसेच भाजपा आणि शिवसेना यांच्यात सद्य स्थितीत युती होणे कठीण दिसत असल्याने स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घटक पक्षांना घ्यावा लागेल, असेही शेट्टी आणि मेटे यांनी सांगितले.