स्मार्ट शहरे, स्मार्ट विकास!

By admin | Published: September 7, 2014 02:40 AM2014-09-07T02:40:39+5:302014-09-07T02:40:39+5:30

स्मार्ट सिटी’ म्हणजे नेमकं काय? सध्याच्या शहरांमध्ये त्यामुळे काय आमूलाग्र बदल होणार आहे? कशी असणार ही स्मार्ट शहरे? यामुळे राहणीमानाचा दर्जा खरोखरच उंचावेल का?

Smart Cities, Smart Development! | स्मार्ट शहरे, स्मार्ट विकास!

स्मार्ट शहरे, स्मार्ट विकास!

Next
सुलक्षणा महाजन  
सध्या ‘स्मार्ट सिटी’ हा परवलीचा शब्द झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जपान दौ:यात ‘वाराणसी - क्योटो’ या शहरांदरम्यान करारही झाला. ‘स्मार्ट सिटी’ म्हणजे नेमकं काय? सध्याच्या शहरांमध्ये त्यामुळे काय आमूलाग्र बदल होणार आहे? कशी असणार ही स्मार्ट शहरे? यामुळे राहणीमानाचा दर्जा खरोखरच उंचावेल का? यासह अनेक प्रश्नांची उकल करण्याचा तज्ज्ञांच्या माध्यमातून केलेला प्रयत्न..
 
गुजरातमध्ये शहरातल्या नागरिकांना ‘कसबाते’ म्हणतात, असे त्रिंबक नारायण अत्ने यांनी 1915 साली म्हणजेच 1क्क् वर्षापूर्वी लिहिलेल्या आपल्या ‘गावगाडा’ पुस्तकात म्हटले आहे. कसबाते म्हणजेच कसब, हुन्नर असणारे. आजच्या भाषेत स्मार्ट! ग्रामीण भागाच्या तुलनेत अनेक बाबतींत शहरी 
लोक साक्षर, अधिक शिकलेले, बहुसांस्कृतिक, सामाजिक दृष्टीने अधिक पुरोगामी, स्वतंत्न, सजग असतात. शहरातील ‘हवा’ लोकांना ‘स्मार्ट’ करते, असेही मानले जाते. आधुनिक शहरातील आगगाडी, बस, ट्राम, मोटारी वगैरे वाहतूक साधने तसेच नळाचे पाणी, वीज, टेलिफोन व संगणक यामुळे लोक स्मार्ट होतात. त्यांची भाषाही समृद्ध होते, वर्तनही सुधारते. लोक वेळ, काम, कला-संस्कृती, उच्च शिक्षणाकडे अधिक लक्ष देतात. स्त्रिया आणि दलित यांना खेडय़ांच्या तुलनेने शहरात अधिक चांगली वागणूक मिळते. शहरीकरणाचे अभ्यासक तर असे मानतात की, शहरीकरणामुळे मानवी जीवनात उत्क्र ांती होते, त्यांच्यात माणुसकी व सहिष्णुता येत.
 
सुविधाच महत्त्वाच्या
गेल्या काही दिवसांपासून ‘स्मार्ट शहरां’ची कल्पना प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेत आली असली, तरी त्यातील काही कल्पनांचा आणि त्यांच्याशी संलग्न तंत्नज्ञानाचा वापर आपल्या शहरांमध्ये सुरू होऊनही बरीच वर्षे झाली आहेत. संगणक वापरून रेल्वेच्या आरक्षणाची सुविधा, हे त्याचे एक महत्त्वाचे उदाहरण. आज आपल्याला बसचेही आरक्षण करता येते. आजकाल पैसे काढण्यासाठी बँकेत जावे लागत नाही आणि खरेदीसाठी पैसे न नेता क्रेडिट कार्ड वापरता येते. मध्यम आणि उच्चमध्यम वर्गातील नागरिकांना व्यवहारात आवश्यक असणा:या अशा अनेक सुविधा स्मार्ट झाल्या आहेत. 
मुंबईमध्ये रस्ते सफाईचे यंत्न आणायला महापालिकेच्या कामगार संघटनांनी 3क् वर्षापूर्वी  विरोध केला होता. त्यामुळे आज कोणत्याही शहरात ती यंत्नणा येऊच  शकली नाही. शहरात नळाने होणा:या पाणीपुरवठय़ाबाबत चोरी, अपव्यय आणि पाणीपट्टी वसुली या तीन मोठय़ा समस्यांमुळे नागरिकांना त्नास सोसावा लागतो. तीच समस्या सांडपाण्याची. पैसे भरले नाहीत तर टीव्हीवरच्या वाहिन्या बंद केल्या जातात, परंतु महापालिकेची पाणीपट्टी न भरणारा सुटतो आणि इतरांना त्याचा त्नास भोगावा लागतो. स्मार्ट शहराच्या नियोजनात प्रत्येक घराची नळजोडणी, सेप्टिक टँक, प्रत्येक कचराकुंडी, कचरा वाहून नेणारा ट्रक ‘स्मार्ट’ करण्याचे तंत्न वापरले आहे. त्याच्या माध्यमातून  आपली शहरे कचरामुक्त होऊ शकतात. अर्थात हे काही आपोआप होत नाही. तर प्रत्येक घराच्या पाण्याच्या मीटरवर, गटारांच्या झाकणावर ‘डोळे’ हणजेच इलेक्ट्रॉनिक सेन्सर बसवले जातात. प्रत्येक रस्त्यावर कॅमेरे बसवले जातात. त्या सर्वाची माहिती, चित्ने बघण्यासाठी नियंत्नण कक्षात खूप स्क्रीन असतात. विशेष संगणक प्रणालीही असते. अपघात करणारे, कायदे मोडणारे वाहन आणि त्या वाहनाचा चालक कोण आहे, हे लगेच समजते आणि त्यांना ताबडतोब दंडही करता येतो. 
 
‘स्मार्ट सेवाकार्ड’ ही विकसित शहरातील मोठीच सोय असते. बस, मेट्रो, ट्रेन, सार्वजनिक स्वच्छतागृहे अशा कोणत्याही सेवेसाठी एकच कार्ड वापरता येते. न्यू यॉर्क शहरात ते वापरून सायकल भाडय़ाने मिळते आणि कमी पैशांत भटकता येते. स्मार्ट शहरांच्या संकल्पनेत अशा असंख्य नावीन्यपूर्ण कल्पना समाविष्ट आहेत आणि त्यांचा झपाटय़ाने विस्तार होत आहे. 
 
रडकथा संपतील
खासगी व काही सार्वजनिक सेवांसाठी स्मार्ट तंत्नज्ञान जरी सवयीचे झाले असले, तरी नागरिकांना मिळणा:या पाण्यासारख्या महत्त्वाच्या सेवेत मात्न स्मार्टपणा आलेला नाही. तीच रडकथा रस्त्यांच्या देखभाल, दुरूस्तीची, शहरातली गटारे, तिथली सांडपाणी व्यवस्था आणि घनकच:याची. नागरिकांच्या सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाच्या असणा:या या सर्व सेवा आज मागास, गावंढळ आणि पारंपरिक तर आहेतच, परंतु ती कामे करणा:यांसाठी तर त्या विशेष घातक आहेत. 
 
अव्यवस्थेवर उपाय
सामाजिक बांधणीत त्यांना कनिष्ठ स्थान देणा:या आहेत. या सेवांच्या नियोजन, व्यवस्थापन आणि देखभालीच्या बाबतीत पराकोटीची अनागोंदी, गोंधळ आणि अव्यवस्था आहे. स्मार्ट शहरांमध्ये अशा सार्वजनिक सेवा आणि नागरिकांना देण्यात येणा:या सर्व सुविधा ‘स्मार्ट’ करण्याची क्षमता असावी हाच खरा स्मार्ट शहरांचा उद्देश आहे, नव्हे असला पाहिजे. 
 
सिंगापूरमध्ये प्रत्येक रस्त्यावर आणि मोटारीत खास उपकरणो असतात. खासगी गाडी सार्वजनिक रस्त्यावर आली की रस्त्याचा टोलमीटर दर किलोमीटरच्या वापरासाठी मोटारीच्या ‘स्मार्ट कार्ड’द्वारे आपोआप पैसे वसुली सुरू करतो. त्यातले पैसे संपले असतील तर जबरदस्त दंड करतो. 
 
ब्राझीलमधील रिओ दि जेनेरो या शहराने 2क्13 साली जगातील सर्वात ‘स्मार्ट शहर’ होण्याचा मान मिळवला. स्मार्ट शहराच्या अनेक कल्पना अंमलात आणल्यामुळे विश्वचषक फुटबॉल आणि ऑलिम्पिक सामन्यांचे आयोजन अतिशय थोडय़ा काळात कार्यक्षमपणो करता आले. 
 
केवळ पाच वर्षापूर्वी, म्हणजेच स्मार्ट शहराच्या कल्पना राबवण्यापूर्वी ते शहर, बेबंद, कायदा न पाळणा:या नागरिकांच्या गुंडगिरीमुळे, अपघात आणि मारामा:यांमुळे भारतातल्याच शहरांप्रमाणोच कुप्रसिद्ध व असुरिक्षत झाले होते. 
 
तेव्हा तेथील नागरिकांना सुरक्षित, सुशिक्षित, जबाबदार आणि समृद्ध करण्याच्या हेतूने स्मार्ट शहराची संकल्पना राबवली गेली. आपल्याकडे ही कल्पना काही नवीन नाही. आधार कार्ड हा त्यातलाच एक महत्त्वाचा टप्पा होता.
 
स्मार्ट शहर कल्पनेचे स्वागत आपण करायला हवे. मात्न त्याचा राजकीय दुरुपयोग होणार नाही, स्मार्ट शहरात लोकशाही हक्कांवर घाला येणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. 
 
‘स्मार्ट’ व्यवस्थापन 
शहरांना आज ‘स्मार्ट’ उत्तराची  आवश्यकता आहे. शहरातील व्यवस्थापन पद्धती ह्या पर्यावरण, सामाजिक व आर्थिक दबावाखाली आहेत. शाश्वत विकासासाठी सर्व शहरांचे व्यवस्थापन सर्वात जास्त व योग्य वापर करून करण्यात यावे यासाठी व्यवस्थापन पद्धतीचा  ‘स्मार्ट’ वापर होणो आवश्यक आहे.
 
च्‘स्मार्ट’ शहरे बांधणी खालील चार महत्त्वाच्या तत्त्वांवर आखली जाते.
च्भविष्यकाळातील 
शहराचा संकल्पनेचा 
सतत पाठपुरावा 
च्प्रत्येक शहर व्यवस्थापन पद्धतीच्या परिवर्तनाबाबत बहुव्याप्त अंतर्भाव
च्बरोबरीच्या शहरा
बरोबर सेवा स्तर मूल्यांकन पद्धत व शहरांचा तुलनात्मक अभ्यास
च्सेवा स्तर मूल्यांकन व शहरांचे ‘रँकिंग’ 
 
‘स्मार्ट’ शहरांसाठी बाबी 
प्रत्येक शहरातील, वास्तवातील सर्व नागरी पायाभूत सेवा ह्या संपूर्णपणो बदलणो हे वेळ व वाढत्या किमतीच्या दृष्टिकोनातून असयुक्तिक व अवाजवी वाटते. परंतु अलीकडच्या उपलब्ध 
अभिनव तंत्रज्ञानाद्वारे आपण शहरातील सध्य अस्तित्वातील पायाभूत सेवा सोयींमध्ये सुधारणा घडवू शकतो. आज नागरी नियोजनात, नागरी सेवा-सुविधा वितरणात, नागरिकांशी अभिवचन निर्माण करण्यात व आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात बरीचशी शहरे स्वत:ची नव्याने मांडणी करीत आहेत. सध्याच्या शहरांची अधिकाधिक नव्याने रचना करणो, त्यांना अनुभवांची देवाण-घेवाणसाठी परस्परांशी जोडणो, नवीन तंत्रज्ञानाचा पुरेसा वापर करणो ह्या गोष्टी ‘स्मार्ट’ शहरे आखणीत महत्त्वाच्या ठरतात. ‘स्मार्ट’ शहरे निर्माण करण्याच्या बाबतीत महत्त्वाच्या बाबी.. 
 
च्संवेदनशील नागरी प्रशासन व तंत्रज्ञानाचा नागरी व्यवस्थापनात सुयोग्य वापर.
च्पर्यावरण व हरित शहरे
च्सार्वजनिक सुरक्षा - सुरक्षित शहरे, महिला संवेदनशील शहरे, अडखळेमुक्त शहरे
च्नागरी मूलभूत सेवा सुविधा वितरण - आरोग्य, पाणी, स्वच्छता, घन कचरा, सांडपाणी व्यवस्थापन, बागा, उद्याने, मैदाने, क्रीडांगणो इ.
 
च्नागरिकांबरोबरचे संबंध व अभिवचन
च्आर्थिक विकास, सुबत्ता
च्शिक्षण / प्रशिक्षण 
व रोजगार संधी
च्हरित इमारती बांधकाम
च्वाहतूक व परिवहन
च्नागरी नियोजन 
च्नागरी व्यवस्थापनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
च्ज्येष्ठ नागरिक व अन्य शारीरिक विकलांग यांना अडथळेमुक्त शहरे व सुविधा. ई- प्रशासन 
 
जग बदलतेय..
आपल्या राज्य आणि केंद्र सरकारपुढे, व्यावसायिक आणि नागरिकांसमोर भरपूर समस्या आहेत. आपल्याला आर्थिक उत्पन्न देणारी शहरे जोडलेली नसणो, पुरवठा 
साखळी मजबूत नसणो, हुशारी आणि संसाधनांची सांगड नसणो असे प्रश्न अजूनही सुटू शकलेले नाहीत. नवनवीन प्रकल्प येत असले तरी येथील प्रशासन मात्र समस्यांच्या जंजाळातून बाहेर पडू शकलेले नाही. यावर उपाय म्हणजे सध्याच्या शहरांना ‘स्मार्ट’ बनविणो. जगभरात असे अनेक प्रयोग झाले. त्यातून उभी राहिलेली काही स्मार्ट शहरे.
 
ब्रिस्टॉल
सामाजिक आणि आर्थिक विकास साधण्याबरोबरच कार्बन उत्सजर्न आटोक्यात आणण्यासाठी या 
शहरात स्मार्ट टेक्नॉलॉजीचा वापर सुरू करण्यात आल्या. या शहरात स्मार्ट एनर्जी प्रकल्प सुरू करण्यात आला़ त्याद्वारे लोकांना आपण किती ऊर्जा खर्च केली याची माहिती आयसीटीद्वारे (इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन्स टेक्नॉलाजी) वेळावेळी मिळते आणि त्यातून ऊर्जाबचतीची प्रेरणाही मिळते.  येथे राबवण्यात आलेला स्मार्ट ट्रान्सपोर्टेशन प्रकल्पामुळे येथील वाहनांना वेळोवेळी शहरातील रस्ते व त्यावरील कोंडीची माहिती मिळते. त्यामुळे कोणत्याही रस्त्यावर वाहतूक कोंडीची समस्या भीषण होत नाही़
 
येथील सरकारने सर्वासाठी माहितीचे भांडार खुले केले आहे. तेथे स्मार्ट डाटा उपक्रम सुरू केला आहे. त्याद्वारे लोकांना माहिती मिळते आणि आपल्या कल्पनाही सरकार्पयत पोहोचवून शहरात तसा स्मार्ट बदल घडवण्यास मदत होते.
 
युरापचा प्रकल्प असलेल्या ‘स्टीप’ अर्थात ‘सोशल टुरिझम युरोपीयन एक्स्चेंज’च्या माध्यमातून शहरात ऊज्रेसंबंधीचा मास्टरप्लॅन तयार करण्यासाठी मदत होते. येथील उद्योगांचीही मोठे बचत होते. 
 
न्यू यॉर्क सिटी
3000
सरकारी इमारतींमध्ये शहरातील किती ऊर्जा वापरली जाते, याची माहिती देणो क्रमप्राप्त आहे. 
 
50000
स्क्वेअर फूटपेक्षा अधिक आकाराच्या प्रत्येक इमारतींना त्यात वापर केलेल्या जाणा:या दरवर्षीच्या ऊज्रेची माहिती देणो बंधनकारक आहे.
 
75
कोटी डॉलरची ग्रिन बिल्डिंग प्लॅननुसार न्यू यॉर्कवासीयांचे ऊर्जाबचत करण्यासह 17 हजार रोजगार कायम राखले जाऊ शकतात. शिवाय नवीन रोजगारही निर्माण केले जाऊ शकतात. 
 
2005 पासून आतार्पयत न्यू यॉर्क 
शहरातील हरितगृह वायू उत्सजर्न प्रमाण 12 टक्क्यांनी घटले आहे. सरकारीपातळीवरील वायू उत्सजर्नही 2क्11 साली 5 टक्के घटले आहे.
 
व्हॅलेन्सिया
महापालिका स्वत: वाहतुकीवर लक्ष ठेवते. त्यासाठी ट्राफिक कंट्रोल सेंटर उभारलेले आहे. 
1क्क् इन्फॉर्मेशन पॅनेल आणि 
1क्क्क् क्रॉसिंग पॉइंट्सद्वारे वाहतुकीची वेळावेळी माहिती पोहोचवली जाते. ही माहिती लोकांर्पयत पोहोचवली जाते. त्यामुळे शहरात पार्किग आणि वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत नाही. व्हॅलेन्सिया मोबिलिटी सोल्युशन्स हे तंत्रज्ञान शहरातील बोगदे आणि कार पार्किग क्षेत्रतील स्थितीची रिअल टाइम माहिती प्रशासनार्पयत पोहोचवते. त्यामुळे तेथील समस्या वेळीच समजतात व त्या वेळीच सोडवल्याही जातात. 
 
पर्यावरण संतुलित राखण्यासाठी या ठिकाणी नियमावली लागू करण्यात आली आहे. ज्यामुळे पर्यावरणासंदर्भातील ठरावीक मुद्दय़ांवर नियमांच्या चौकटीत राहून सोडवण्याचा चांगला पर्याय आहे.
 
वाहतूक व्यवस्थापनासाठी हरित दिव्यांचा वापर वाढवणो किंवा वाहनचालकांना इंजिन बंद करण्याच्या सूचना देण्यासंबंधी हरित दिव्यांचा वापर करता येतो. 
 
लंडन 
लंडनमधील सरकारी इमारती, तसेच गृह संकुलनांची ऊर्जा कार्यशम बनवण्याच्या दृष्टीने पुनर्बाधणी करणो. ज्यामुळे दरवर्षी लाखो पौंडची बचत होईल. कार्बन उत्सजर्न 2क् टक्क्यांनी कमी करण्यासाठी लंडन आणि परिसरात 1क् कमी कार्बन उत्सजर्न क्षेत्र तयार करणो. 
 
द हेग
हेगचे शेजारी शहर असलेल्या व्होजलविकमधील स्थानिकांनी स्वखर्चाने नादुरुस्त पवनचक्क्यांना दुरुस्त करून कार्यान्वित केले. या पवनचक्क्यांमधून 45क् घरांना हरित ऊर्जा मिळत असून, शेजारधर्माचे हे सर्वोत्तम उदाहरण म्हणता येईल. ज्यात एखाद्या उपक्रमाची सुरुवात व अंमलबजावणीसाठी नागरिक जबाबदारी घेतो.
 
बर्लिन 
कचरा व्यवस्थापनासाठी या ठिकाणी इंटरफेस सेन्सर आणि रेडिओ इंटरफेसचा वापर केला जातो. सेन्सेरमधून मिळालेल्या माहितीच्या आधारे ज्या ठिकाणी गरज असते त्या ठिकाणी आवश्यक कचराकुंडय़ा वेळेत देण्यास मदत होते. याशिवाय ज्या कचराकुंडय़ा पूर्णपणो भरल्या आहेत अशाच कुंडय़ांची सफाई करण्याची या ठिकाणी पद्धत आहे. ज्यामुळे सफाई कामगारांनाही दिलासा मिळतो. तसेच वाहतुकीचा अनावश्यक खर्च वाचतो. उत्सर्जन कमी होते. याशिवाय ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण मिळवता येते. 
 

 

Web Title: Smart Cities, Smart Development!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.