स्मार्ट फोन, इंटरनेटपासून ग्रामस्थ दूरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2017 02:13 AM2017-01-01T02:13:29+5:302017-01-01T02:13:29+5:30

‘कॅशलेस’ला जिल्ह्यात जनतेचा पाठिंबा मिळतो आहे़ मात्र, मूलभूत सोयींपासून कोसो दूर असलेल्या गावागावांमध्ये त्याची अंमलबजावणी करणे अवघड होत आहे.

Smart Phone, Remote Locomotive from Internet | स्मार्ट फोन, इंटरनेटपासून ग्रामस्थ दूरच

स्मार्ट फोन, इंटरनेटपासून ग्रामस्थ दूरच

googlenewsNext

‘कॅशलेस’ला जिल्ह्यात जनतेचा पाठिंबा मिळतो आहे़ मात्र, मूलभूत सोयींपासून कोसो दूर असलेल्या गावागावांमध्ये त्याची अंमलबजावणी करणे अवघड होत आहे. लातूर जिल्ह्यातील संगाचीवाडी (ता़चाकूर) येथील ग्रामस्थांनीही ‘कॅशलेस’चे कौतुक केले़, पण तांत्रिकदृष्ट्या आणखी सुविधांची ग्रामस्थांना प्रतीक्षा आहे. गावात स्मार्ट फोन वापरणाऱ्यांची संख्या जेमतेम १० टक्के आहे़ सर्वच मोबाइल आॅपरेटर्सच्या नेटवर्कचे जाळे गावापर्यंत पसरल्याने नेट कनेक्टिव्हिटी आहे़ मात्र, बहुतांश नागरिक शेती व शेतीशी संबंधित व्यवसायात असल्याने स्मार्ट फोन, इंटरनेटपासून गावकरी बरेच दूर आहेत़

गाव : संगाचीवाडी
(ता़ चाकूर जि़ लातूर)
लोकसंख्या : ६००
लातूरपासूनचे अंतर : ५५ किलोमीटर
बँकांची संख्या : एकही नाही
डाक कार्यालय : नाही
एटीएम : नाही
वाहतूक सुविधा : बस, खाजगी वाहने
स्मार्टफोनधारकांची संख्या : ५५
साक्षरतेचे प्रमाण : ८० टक्के
इंटरनेट सुविधा : फक्त मोबाईल नेटवर्कद्वारे आहे़ कनेक्टिव्हिटी चांगली
वीजपुरवठा : १८ तास, ६ तासांचे भारनियमन, एका आठवड्यात पहाटे ४ ते सकाळी १० पर्यंत तर दुसऱ्या आठवड्यात सायंकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत
कॅशलेस व्यवहार : बोटावर मोजण्याइतकेच लोक शहरात डेबिट कार्डद्वारे असे व्यवहार करीत आहेत़

गावात अजूनही ९० टक्क्यांहून अधिक लोकांना तंत्रज्ञान माहीत नाही़ अनेकांचा बँकेशी संबंध आला नाही़ हाती चार पैसे आगाऊ असतील, तेव्हाच या गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न गावात असतो़
- बालाजी वाडकर,
जमीन खरेदी-विक्री व्यावसायिक, संगाचीवाडी

आम्ही कॅशलेस व्यवहार करण्यासाठी तयार आहोत़, परंतु आमच्याकडे येणारे बहुतांश ग्राहक कॅशलेसबाबत अनभिज्ञ आहेत़ त्यांची जनजागृती केल्यासच योजना तडीस जाऊ शकते़
-सिद्धेश्वर वाडकर,
किराणा दुकानदार,
संगाचीवाडी

नोटाबंदीपासून व्यवसाय अर्ध्यावरच आला आहे़ कॅशलेस काय हेच माहिती नाही. इंग्रजी व तंत्रज्ञानापासून आम्ही खूप दूर आहोत़ त्यामुळे असे व्यवहार सुरू झाल्यास दुकान बंद करण्यावाचून पर्याय नाही़
- देविदास बिरादार,
किराणा दुकान
व्यावसायिक, संगाचीवाडी

शेती आधीच संकटात आहे़ शेतमाल विक्रीतून येणारे पैैसे कर्ज, उधार-उसणवारीत संपून जातात़ बँकेत खाते आहे़ मात्र, व्यवहार कधी केला नाही़ हे खाते केवळ अनुदानापुरते वापरात आहे़ शेतकऱ्याला ‘डिजिटल’ होणे कसे परवडणार?
- गंगाधर घुमे,
शेतकरी, संगाचीवाडी

यापूर्वी क्वचितप्रसंगी कॅशलेस व्यवहार करीत होतो़, परंतु नोटाबंदीपासून मी डेबिट कार्डाद्वारे कॅशलेस व्यवहार करीत आहे़ ही सुटसुटीत प्रक्रिया आहे़ तयार असलो, तरी गावे कॅशलेस होण्यात अडचणी आहेत़
-किरण वाडकर,
शेतकरी, संगाचीवाडी.

Web Title: Smart Phone, Remote Locomotive from Internet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.