मुंबईकर तरुणाने बनविला ‘स्मार्ट रेडिओ’

By admin | Published: March 6, 2016 03:02 AM2016-03-06T03:02:22+5:302016-03-06T03:02:22+5:30

‘मेक इन इंडिया’च्या धर्तीवर मुंबईच्या अभिजित दायगव्हाणे या तरुणाने ‘स्मार्ट रेडिओ’ची निर्मिती केली आहे. या अत्याधुनिक रेडिओच्या माध्यमातून वाहतूक व्यवस्थापन प्रक्रियेत साहाय्य होणार आहे.

'Smart Radio' made by Mumbaikar Youth | मुंबईकर तरुणाने बनविला ‘स्मार्ट रेडिओ’

मुंबईकर तरुणाने बनविला ‘स्मार्ट रेडिओ’

Next

मुंबई : ‘मेक इन इंडिया’च्या धर्तीवर मुंबईच्या अभिजित दायगव्हाणे या तरुणाने ‘स्मार्ट रेडिओ’ची निर्मिती केली आहे. या अत्याधुनिक रेडिओच्या माध्यमातून वाहतूक व्यवस्थापन प्रक्रियेत साहाय्य होणार आहे. या स्मार्ट रेडिओची जीपीएस यंत्रणा, आॅक्सिजन सेन्सर, टेम्परेचर सेन्सर ही प्रमुख वैशिष्ट्ये असून हा रेडिओ सौर बॅटरीच्या साहाय्याने वापरता येणार आहे.
वर्सोवा येथील राजीव गांधी इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नोलॉजीच्या अभियांत्रिकी शाखेत पदव्युत्तर शाखेचे शिक्षण घेणाऱ्या अभिजितने मित्रांच्या मदतीने या स्मार्ट रेडिओची निर्मिती केली आहे. या स्मार्ट रेडिओच्या माध्यमातून मनोरंजनासोबतच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुलभ होण्यासाठी मदत होईल, असे अभिजितने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. या स्मार्ट रेडिओच्या निर्मितीसाठी अभिजितला विनीत सिंग कश्यप, योगेश महाजन आणि योगेश प्रजापती या इंजिनीअंरिगच्या मित्रांचाही सहभाग आहे. या चौघांना कॅप्टन राज राणे यांनी मार्गदर्शन केले आहे.
स्मार्ट रेडिओमध्ये जीएसएम आॅटोमेशनची सेवा उपलब्ध आहे. या सेवेमुळे हा स्मार्ट रेडिओ कुठूनही रिमोटच्या साहाय्याने हाताळता येऊ शकतो. शिवाय, या रेडिओमध्ये एलसीडी डिस्प्ले असून रेल्वे अथवा बेस्ट बसमध्ये उद्घोषणेच्या वेळी रेडिओचा आवाज आपोआप कमी होण्याचा पर्याय उपलब्ध आहे. तसेच या रेडिओच्या माध्यमातून वाहतुकीदरम्यान सिग्नल यंत्रणेतील बिघाड, बोगदा याविषयी पूर्वसूचना मिळणार आहे. या रेडिओमध्ये बॅटरी बॅकअपचीही सुविधा आहे. याच्या साहाय्याने आपत्कालीन घटनेबद्दल सतर्क राहण्यासही मदत मिळणार आहे.
या रेडिओचे दोन पेंटट्स मिळण्यासाठी अर्ज दाखल केला असल्याचे अभिजितने सांगितले. शिवाय, हा स्मार्ट रेडिओ रेल्वे आणि बेस्ट बसमध्ये लावण्यासाठी दोन्ही प्रशासनांशी बोलणी सुरू आहेत. दोन्ही प्रशासन याबाबत सकारात्मक असून पुढच्या आठवड्यात सादरीकरण करणार असल्याचे त्याने सांगितले. शिवाय, रेल्वे अथवा बेस्ट प्रशासनाने या स्मार्ट रेडिओला हिरवा कंदील दाखविल्यास हे रेडिओ डिव्हाइस मोफत लावण्यात येणार आहे. भविष्यात यात अधिकाधिक फिचर्सचा समावेश करण्यासाठी विविध बाजूंनी अभ्यास आणि संशोधन सुरू असल्याचे अभिजितने सांगितले.
> च्वर्सोवा येथील राजीव गांधी इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नोलॉजीच्या अभियांत्रिकी शाखेत पदव्युत्तर शाखेचे शिक्षण घेणाऱ्या अभिजितने मित्रांच्या मदतीने या स्मार्ट रेडिओची निर्मिती केली आहे. या स्मार्ट रेडिओच्या माध्यमातून मनोरंजनासोबतच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुलभ होण्यासाठी मदत होईल, असे अभिजितने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

Web Title: 'Smart Radio' made by Mumbaikar Youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.