स्मार्ट सिटीनंतर आता राज्यात स्मार्ट ग्राम !

By admin | Published: May 20, 2015 02:13 AM2015-05-20T02:13:39+5:302015-05-20T02:13:39+5:30

स्मार्ट सिटीच्या धर्तीवर स्मार्ट ग्राम योजना राबविण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. पुणे जिल्ह्यातील माळीण गावापासून त्याची सुरुवात होणार आहे.

Smart village now in the state after smart city! | स्मार्ट सिटीनंतर आता राज्यात स्मार्ट ग्राम !

स्मार्ट सिटीनंतर आता राज्यात स्मार्ट ग्राम !

Next

यदु जोशी ल्ल मुंबई
स्मार्ट सिटीच्या धर्तीवर स्मार्ट ग्राम योजना राबविण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. पुणे जिल्ह्यातील माळीण गावापासून त्याची सुरुवात होणार आहे. खेडी स्वयंपूर्ण करण्यासाठी उचललेले हे महत्त्वाकांक्षी पाऊल असून सुरुवातीला १० स्मार्ट ग्रामची उभारणी केली जाईल, असे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
ही कल्पना पुढे आल्यानंतर पहिले स्मार्ट ग्राम माळीण असावे, हा विचार समोर आला. ग्रामविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी माळीणला नुकतीच भेट दिली. शहरांवरील वाढता भार कमी करायचा असेत तर खेडी समृद्ध करणे आणि खेड्यांमध्येही उपजिविकेची साधने उपलब्ध होऊ शकतात, हा विश्वास निर्माण करण्याचा स्मार्ट ग्रामचा उद्देश असल्याचे मुंडे म्हणाल्या.
योजनेची पंचसूत्री
एस फॉर सॅनिटेशन (स्वच्छता), एम - मॅनेजमेंट/मॉडर्नायझेशन, (व्यवस्थापन), ए - अकाउंटॅबिलिटी (उत्तरदायित्व), आर - रिन्युएबल एनर्जी (अपारंपरिक ऊर्जा) व टी- ट्रान्स्फ रन्सी ही स्मार्ट ग्रामची पंचसूत्री असेल.
बदल्यांसाठी भरला मेळा
सह्याद्री अतिथीगृहावर आज वेगळे चित्र होते. एकेक अधिकारी उभे राहून त्याला कुठे बदली हवी आहे ते सांगत होता आणि त्याची मागणी मान्य केली जात होती. ग्रामविकास विभागांतर्गत कार्यरत साहाय्यक गटविकास अधिकारी आणि बालविकास प्रकल्प अधिकारी राज्यभरातून आपल्या बदलीचा ‘चॉइस’ सांगण्यासाठी मंत्री पंकजा मुंडे आणि सचिव व्ही. गिरीराज यांच्यासमोर हजर झाले. आमच्या हयातीत आम्हाला असा ‘चॉइस’ पहिल्यांदाच विचारला गेल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. मी पारदर्शकपणे बदल्या करतेय, तुम्ही पारदर्शकपणे काम करावे, अशी अपेक्षा पंकजा यांनी व्यक्त केली.

पर्यावरण संतुलित ग्रामविकास योजना बंद पर्यावरण संतुलनात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गावांना पर्यावरण संतुलित ग्रामविकास योजनेंतर्गत दरवर्षी बक्षिसे दिली जातात. ही योजना आता बंद करण्याचा शासनाचा विचार आहे. केवळ बक्षिसे देण्याइतपत ही योजना मर्यादित राहते. बक्षिसे मिळालेल्या
गावांनी पुढे पर्यावरण राखले का, याचे कुठेही आॅडिटिंग होत नाही. बक्षिसांचा सोपस्कार करण्याऐवजी योजना बंद करणे योग्य ठरेल, असे मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले.

Web Title: Smart village now in the state after smart city!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.