दहा बालकांच्या चेह-यावर ‘मुस्कान’
By Admin | Published: March 3, 2016 02:15 AM2016-03-03T02:15:56+5:302016-03-03T02:32:52+5:30
प्रकटदिनी १0 बालकांचा शोध : जिल्हा बाल संरक्षण विभागाची कामगिरी.
खामगाव (जि. बुलडाणा) : शेगाव येथे ङ्म्री संत गजानन महाराजांच्या प्रकटदिनासाठी लाखो भाविकांची मांदीयाळी जमते. या यात्रेत अनेक मुले हरवतात. हरवलेल्या दहा मुलांचा जिल्हा बाल संरक्षण कक्षाने शोध घेऊन त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधिन केले. दरवर्षी प्रकट दिननिमित्त शेगाव येथे भाविक भक्त कुटुंबासह दाखल होतात. यावेळी गर्दीमध्ये काही लहान मुले हरवतात. या वर्षी शेगावात जवळपास साडे तीन लाख भक्तांनी श्रींच्या दर्शनासाठी हजेरी लावली होती. गर्दीमध्ये तीन ते आठ वर्ष या वयोगटातील १0 मुले हरवली. त्यामध्ये सहा मूली व चार मुलांचा समावेश होता. ही मुले समाजकंटकांच्या हाती लागू नयेत यासाठी जिल्हा बाल सरंक्षण कक्ष डोळसपणे काम करत होता. या कक्षाला शेगावात मुंबई, औरंगाबाद, भुसावळ, अमरावती, नांदेड, परभणी, यवतमाळसह काही गावातून आलेल्या भाविकांची मुले भेदरलेल्या अवस्थेत आढळून आली. त्यांना ताब्यात घेत या मुलांकडून त्यांच्या आई वडीलांची माहिती घेतली व त्यांना त्याच दिवशी शोधून पालकांच्या स्वाधीन केले. यासाठी या कक्षाला अप्पर पोलीस अधिक्षक यशवंत साळुंके, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती रुपाली दरेकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरिक्षक प्रतापसिंह सिकारे यांनी मदत केली. जिल्हा बाल संरक्षण अधिकार शाहानवाज खान यांच्या सोबत या चमु मध्ये पोलीस निरिक्षक तड्वी,पोलीस निरिक्षक मोनालिसा मोरे,सामाजिक कार्यकर्ते दिवेश मराठे यांचा समावेश होता. गतवर्षी प्रकटदिनी या कक्षाने ९ बालकांचा शोध घेऊन त्यांना पालकांच्या स्वाधीन केले होते.