अंगावरून साप गेला आणि मी मुख्यमंत्री झालो, शरद पवारांनी सांगितली दिलखुलास आठवण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2017 05:09 PM2017-10-27T17:09:16+5:302017-10-27T17:09:50+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे-पाटील यांच्या एकसष्टीनिमित्त आयोजित समारंभात शरद पवार यांनी त्यांचा मुख्यमंत्री बनण्याबाबतचा एक किस्सा सांगितला. हा किस्सा सांगताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.

Snake went snake and I became CM, Sharad Pawar told Dilkhulas | अंगावरून साप गेला आणि मी मुख्यमंत्री झालो, शरद पवारांनी सांगितली दिलखुलास आठवण

अंगावरून साप गेला आणि मी मुख्यमंत्री झालो, शरद पवारांनी सांगितली दिलखुलास आठवण

googlenewsNext

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे-पाटील यांच्या एकसष्टीनिमित्त आयोजित समारंभात शरद पवार यांनी त्यांचा मुख्यमंत्री बनण्याबाबतचा एक किस्सा सांगितला. हा किस्सा सांगताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.
काय म्हणाले शरद पवार -
दिलीप वळसे पाटील यांचे वडील दत्तात्रय वळसे-पाटील यांच्यासोबत एकदा भीमाशंकरला गेलो होतो. तेव्हा मी राज्याचा उद्योगमंत्री होतो. एका खोलीत आमची राहण्याची सोय होती. रात्री एकच्या सुमारास मला थोडी हालचाल जाणवली म्हणून उठून बसलो तर माझ्या अंगावरून एक साप सरपटत खिडकीतून बाहेर जाताना दिसला.  या प्रकारामुळे मी सुन्न झालो आणि दत्तात्रय पाटील यांना हाक मारली.   
दत्तात्रय पाटील यांना घडलेला सर्व प्रकार मी सांगितला तर त्यांना आनंद झाला. हा शुभशकुन आहे , आपण पहाटे पूजा करूया असं ते म्हणाले. त्यांचा सल्ला ऐकून मी पूजा केली आणि आम्ही दोघेही मुंबईला परतलो. त्याच दिवशी विधानसभेत अशा काही घडामोडी घडल्या की मी पदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर आठ दिवसांत मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीच झालो, असं पवार म्हणाले.  
दिलीप वळसे-पाटील यांच्या वडिलांनी सांगितल्याप्रमाणे तो शुभशकुन मी त्यावेळी अनुभवला. त्यानंतर माझी पत्नी सातत्याने भीमाशंकरला जाते. मी काही फारसा जात नाही. ही आठवण सांगताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.
 त्यानंतर पवारांनी आणखी एक आठवण सांगितली, दिलीपरावांचे वडील दत्तात्रय पाटील एकदा माझ्याकडे दिलीपला घेऊन आले. माझा मुलगा ग्रॅज्युएट झाला. त्याला नोकरी लावा, अशी विनंती त्यांनी मला केली. त्यावेळी राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष नानासाहेब सकपाळ होते. मी त्यांना सांगितले की, तुमच्याकडे जागा आहे की नाही मला माहिती नाही, पण आपल्या माणसाचा मुलगा आहे त्याच्या नोकरीचे बघा, असे सांगून मी दिलीपला त्यांच्याकडे पाठवले. त्यानंतर काय घडले माहिती नाही. अशी आठवणही पवारांनी सांगितली. 

Web Title: Snake went snake and I became CM, Sharad Pawar told Dilkhulas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.