स.न.वि.वि. ‘शौचालय बांधून घ्या’!
By admin | Published: August 31, 2016 05:32 PM2016-08-31T17:32:26+5:302016-08-31T17:32:26+5:30
‘सप्रेम नमस्कार, विनंती विशेष...’ हे पोस्टकार्डवरील शब्द आधुनिक तंत्रज्ञानात दुर्मिळ होत असताना जिल्हा परिषदेने मात्र पाणंदमुक्तीची मोहीम गतिमान करण्यासाठी पत्राची
Next
>ऑनलाइन लोकमत
बीड, दि. ३१ - ‘सप्रेम नमस्कार, विनंती विशेष...’ हे पोस्टकार्डवरील शब्द आधुनिक तंत्रज्ञानात दुर्मिळ होत असताना जिल्हा परिषदेने मात्र पाणंदमुक्तीची मोहीम गतिमान करण्यासाठी पत्राची मात्रा वापरली आहे. विद्यार्थी व नातेवाईकांमार्फत पत्र पाठवून शौचालय बांधण्याची भावनिक विनंती केली जात आहे. अवघ्या ५० हजार रुपयांत एक लाख कुटुंबियांपर्यंत पोहोचण्याचा हा पत्रप्रपंच मोहिमेसाठी फलदायी ठरत आहे.
जि.प. सीईओ नामदेव ननावरे यांच्या संकल्पनेतून ‘नातं जबाबदारीचं’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविला जात आहे. त्यांतर्गत १५ हजार अधिकारी, कर्मचा-यांमार्फत २५ हजार कुटुंबियांना शौचालय बांधून देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. कर्मचा-यांनी आपल्या जवळच्या मित्रांना, नातेवाईकांना शौचालय बांधून द्यायचे आहे. सीईओंनी त्यासाठी पावतीपुस्तके छापली असून भेटावयास येणाºया प्रत्येकाला ते शौचालय बांधण्यास प्रवृत्त करतात. आमूक नातेवाईकांना मी शौचालय बांधून देत असल्याचे या पावतीपुस्तकात कर्मचा-यांनी नोंद करावयाची आहे. दरम्यान, जि.प. मार्फत कर्मचा-यांनी ज्या नातेवाईकाला शौचालय बांधून देण्याचे आश्वासन दिले, त्याचे काय झाले? हे जाणून घेण्यासाठी पत्रव्यवहार केला जाणार आहे.