"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2024 02:43 PM2024-11-16T14:43:26+5:302024-11-16T14:44:10+5:30
आता अशोक चव्हाण हे आपल्याकडे आले आहेत. ते आपल्याकडे आले. कारण त्यांना काँग्रेसचे विचार पटले नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच पक्ष संपूर्ण शक्तीनिशी प्राचार करताना दिसत आहेत. दरम्यान, राज्यसभेतील खासदार अशोक चव्हाण यांच्या काँग्रेस सोडून भाजपमधील प्रेवेशासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले आहे. "काँग्रेसने बाबासाहेबांना दोन वेळा निवडणुकीत हारलवले. आता अशोक चव्हाण हे आपल्याकडे आले आहेत. ते आपल्याकडे आले. कारण त्यांना काँग्रेसचे विचार पटले नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ते नांदेडमध्ये महायुतीच्या प्रचारसभेत बोलत होते.
शिंदे म्हणाले, "काँग्रेसने बाबासाहेबांना दोन वेळा निवडणुकीत हारलवले. आता अशोक चव्हाण हे आपल्याकडे आले आहेत. ते आपल्याकडे आणल्याने या जिल्ह्याची आणि महायुतीची ताकद वाढली आहे. ते आपल्याकडे आले. कारण त्यांना काँग्रेसचे विचार पटले नाही. काँग्रेसने बाबासाहेबांना खूप त्रास दिला. बाबासाहेब म्हणाले होते, 'काँग्रेस हे जळक घर आहे, यापासून दूर रहा'. हे बरोबर अशोक चव्हाण यांनी ते ऐकले." यावेळी, "जोवर सूर्य आणि चंद्र असेल, तोवर बाबासाहेबांचे संविधान कायम राहील," असेही शिंदे म्हणाले.
कुणीही आले तरी लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही -
शिंदे पुढे म्हणाले, "इथे तुम्ही माझ्या लाडक्या बहिणी आलेल्या आहेत, लाडके भाऊ आलेले आहेत, सगळे लाडके आहेत. माझं एक काम कराल? लाडक्या बहिणींनी जाऊन आपल्या विभागामध्ये ज्या आणखी दुसऱ्या आपल्या बहिणी आहेत, त्यांना सांगाल, आम्ही आता आमचा लाडक्या भाऊ एकनाथ शिंदेला भेटून आलो आहोत. त्यांनी आम्हाला सांगितले आहे, कुणीही आले तरीसुद्धा लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही."
निवडून आले, म्हणाले पैसे नाही -
"आता ज्यांनी विरोध केला तेच लोक तुमच्याकडे येतील. आम्ही ३००० रुपये देतो, अरे देणार कुठून? सरकार मध्ये तुम्ही आहात का? कर्नाटकात, तेलंगणामध्ये, राजस्थानमध्ये, हिमाचलमध्ये घोषणा केल्या, आम्ही हे देतो, ते देतो, ते देतो, निवडून आले, म्हणाले पैसे नाही. केंद्राकडे मागायला लागले, मोदीजींकडे. अरे तुम्हाला काही वाटायला हवे, खोटे बोलायला. खोटे बोल पण रेटून बोल. हे फसवणारे, खोटारडे, हे खोटे नॅरेटिव्ह पसरवणारे लोकसभेत त्यांनी फसवले. संविधान बदलणार, आरक्षण जाणार, सगळ्या लोकांना घाबरवलं, मुसलमानांना घाबरवलं, ख्रिश्चनांना घाबरवलं, शिखांना घाबरवलं आणि फेक नॅरेटिव्ह पसरवला," असेही शिंदे यावेळी म्हणाले.