...म्हणून सुटतात लाचखोर !
By admin | Published: September 22, 2014 02:09 AM2014-09-22T02:09:45+5:302014-09-22T02:09:45+5:30
लाचखोरीच्या प्रकरणांमध्ये तपासातील त्रुटी आणि कायद्यातील पळवाटा लाचखोरांच्या पथ्यावर पडत असल्याचे चित्र शिक्षेच्या अल्प प्रमाणावरून पाहावयास मिळते
अकोला : लाचखोरीच्या प्रकरणांमध्ये तपासातील त्रुटी आणि कायद्यातील पळवाटा लाचखोरांच्या पथ्यावर पडत असल्याचे चित्र शिक्षेच्या अल्प प्रमाणावरून पाहावयास मिळते. चालू वर्षात आतापर्यंत राज्यात एकूण १७७ खटले चालविण्यात आले. त्यापैकी केवळ ५४ खटल्यांमध्ये आरोपींना शिक्षा झाली असून, १२३ खटल्यांमधील आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे.
शासकीय-निमशासकीय कार्यालयांतील भ्रष्टाचारावर कारवाईच्या माध्यमातून अंकुश ठेवण्याची जबाबदारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागावर आहे. अलीकडच्या काळात या विभागाने धडाक्यात कारवाया केल्या.
मात्र भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई केल्यानंतर, तपासातील त्रुटी आणि कायद्यातील पळवाटा आरोपींसाठी फायद्याच्या ठरत आहेत.
वरिष्ठ अधिकारी तपासामध्ये त्रुटी असल्यास दुरुस्त करतात. प्रसंगी विधी विभागाचा सल्लाही घेतात. नंतरच दोषारोपपत्र दाखल करण्यास वरिष्ठांकडून मंजुरी दिली जाते.