Maharashtra Political Crisis: अब तक ४६! सहा तासांत एकनाथ शिंदेंकडे सहा आमदार वाढले; गुलाबराव पाटीलही निघाले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 02:14 PM2022-06-22T14:14:54+5:302022-06-22T14:15:22+5:30
धक्कादायक म्हणजे शिवसेनेचा वाघ म्हटले जाणारे गुलाबराव पाटील देखील गुवावाहाटीला निघाल्याचे समजते आहे. यानंतर शिवसेनेने ठेवलेल्या हॉटेलमधील काही आमदार देखील सायंकाळी गुवाहाटीला निसटण्याची शक्यता आहे.
सकाळीच एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत सध्या ४० आमदार असल्याचे म्हटले होते. तसेच आणखी १० आमदार येतील असे म्हटले होते. आता दुपारी त्यांनी आपल्याकडे ४६ आमदार आल्याचे म्हटले आहे. म्हणजेच सहा तासांत सहा आमदार वाढले आहेत. शिवसेनेचे दोन आणि अपक्ष तीन असे पाच आमदार सायंकापर्यंत गुवाहाटीला पोहोचण्याची शक्यता आहे.
धक्कादायक म्हणजे शिवसेनेचा वाघ म्हटले जाणारे गुलाबराव पाटील देखील गुवावाहाटीला निघाल्याचे समजते आहे. यानंतर शिवसेनेने ठेवलेल्या हॉटेलमधील काही आमदार देखील सायंकाळी गुवाहाटीला निसटण्याची शक्यता आहे.
आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. हिंदुत्व ही आमची भूमिका आहे. त्याच्याशी कदापीही तडजोड केली जाणार नाही, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. आपल्यासोबत ४६ आमदार आहेत, आणखी काही येत आहेत. आमचे सहकारी पक्षाचे आमदारही यात आहेत, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.
उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरेंसोबत काल बोलणे झाले. आम्ही आमची भूमिका मांडली आहे. आम्हाला हिंदुत्व सोडून चालणार नाही. यामुळे आम्ही हिंदुत्वाची भूमिका मांडली आहे, असेही शिंदे म्हणाले. मी कोणत्याही आमदारावर जबरदस्ती केलेली नाही. ते आपल्या इच्छेने आलेले आहेत. देशमुखांना जर मी बळजबरीने ठेवले असते तर त्यांना आम्ही सोडायला गेलोच नसतो, असेही ते म्हणाले.