आतापर्यंत राज्यात झाला १२३% पाऊस; नागपूर विभागात सर्वाधिक; नाशिकमध्ये सर्वात कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 06:47 AM2024-08-12T06:47:36+5:302024-08-12T06:52:54+5:30

कोकणातील धरणांमध्ये सर्वाधिक पाणीसाठा, सर्वात कमी संभाजीनगरातील धरणांमध्ये...

So far the state has received 123% rainfall; Highest in Nagpur Division; Lowest in Nashik | आतापर्यंत राज्यात झाला १२३% पाऊस; नागपूर विभागात सर्वाधिक; नाशिकमध्ये सर्वात कमी

आतापर्यंत राज्यात झाला १२३% पाऊस; नागपूर विभागात सर्वाधिक; नाशिकमध्ये सर्वात कमी

चंद्रकांत कित्तुरे, लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर: राज्यभरात सध्या पावसाने उघडीप दिली असली, तरी चालू हंगामात ११ ऑगस्टअखेर १२३.९ टक्के पाऊस झाला आहे. या काळात सरासरी ६४० मिलिमीटर पाऊस होतो. यंदा तो ७९२.८ मिलिमीटर झाला आहे. नागपूर विभागात सर्वाधिक १३३.५ टक्के, तर तर सर्वात कमी नाशिक विभागात १०८.९ टक्के पाऊस झाला आहे. यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.  पावसाळा १ जून ते १ सप्टेंबरपर्यंत असतो. ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला.

धरणांमध्ये ७ टक्के जादा पाणीसाठा

राज्यात मोठे, मध्यम आणि लघु, अशी एकूण २,९९७ धरणे आहेत. त्यांची क्षमता ४८,२५४.८३  दशलक्ष घनमीटर आहे. सध्या या धरणांमध्ये ६७.५० टक्के म्हणजेच ३५,०२१. ६५ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. गतवर्षी याच कालावधीत हा पाणीसाठा ६०.५५ टक्के होता. कोकण विभागातील १७३ धरणांमध्ये सर्वाधिक ८९.२० टक्के, तर सर्वात कमी छत्रपती संभाजीनगर विभागात २६.४५ टक्के पाणीसाठा आहे. पावसाळा सप्टेंबरपर्यंत असल्याने पाणीसाठ्यात आणखी वाढ अपेक्षित आहे.

विभागनिहाय पाऊस (मिमीमध्ये)

विभाग              सर्वसाधारण    प्रत्यक्ष       टक्केवारी
कोकण           १९९८.३    २४५०.३    १२२.६   
नाशिक           ४२८.२    ४६६.१      १०८.९
पुणे               ६१३.६    ७१४        ११६.४
छ. संभाजीनगर  ३८८.८    ४५४.७     ११६.९
अमरावती        ४६९.४    ५५६.५      ११८.६
नागपूर            ६७२.८    ८९८.३       १३३.५

  • १०५.७ मिमी - जून महिन्यात
  • १४४.८ मिमी - जुलै महिन्यात
  • ९२.९%  - ऑगस्टच्या ११ दिवसांत

Web Title: So far the state has received 123% rainfall; Highest in Nagpur Division; Lowest in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.