...म्हणून सदाभाऊ खोत बनले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सावली!
By admin | Published: June 12, 2017 08:46 PM2017-06-12T20:46:15+5:302017-06-12T20:46:15+5:30
कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोतांच्या मध्यस्थीमुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कर्जमाफीसारखा महत्त्वाचा निर्णय घेतल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 12 - कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोतांच्या मध्यस्थीमुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कर्जमाफीसारखा महत्त्वाचा निर्णय घेतल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. सदाभाऊ खोत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पूर्वीपासूनच घरोब्याचे संबंध असल्याचे आता समोर आले आहे. त्यानंतर सदाभाऊ खोतांच्या मातोश्रींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं फ्री प्रेस जर्नलला दिलेल्या मुलाखतीत तोंडभरून कौतुक केलं आहे.
जेव्हा मालक (पती) कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराने त्रस्त होते, त्यावेळी त्यांच्या उपचारासाठी आम्हाला लाखो रुपये खर्च अपेक्षित होता. मायानगरी मुंबईमध्ये या संकटाच्या वेळी आमच्यासोबत भक्कमपणे उभे राहिले ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस!" "जेव्हा आम्ही ह्या परिस्थितीशी सामना करत होतो त्यावेळी सदा न मंत्री होता न आमदार!, तरीही मुख्यमंत्र्यांनी आम्हाला मदत केली, असं सदाभाऊंच्या मातोश्री सांगत होत्या.
पुढे सदाभाऊंच्या आई म्हणाल्या, "आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांच्या संपामुळे अडचणीत असताना सदा त्यांना एकटं सोडणार नाहीच, पण वेळप्रसंगी सदाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी राजीनामा जरी दिला तरी मला त्याची चिंता नाही!" फ्री प्रेस जर्नलशी बोलताना सदाभाऊ खोत भक्कमपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सावली म्हणून का वावरतात? याचे सकारण विश्लेषण त्यांच्या आई रत्नाबाई रामचंद्र खोत यांनी आवर्जून केलं आहे. त्यावेळी मंत्री सदाभाऊ खोतसुद्धा उपस्थित होते.
ज्या प्रकारे सोशल मीडियामध्ये माझ्यावर जहरी टीका केली जाते, त्यामुळे मी अस्वस्थ आहे. मला शेतकरी विरोधही ठरवले जात आहे. मला कुठल्याही प्रकारची हौस नाही, मी शेतात बसूनसुद्धा बैठका घेतल्या आहेत. मी शेतकऱ्यांसोबत तळागाळात बसणारा-उठणारा-जेवणारा-रमणारा कार्यकर्ता आहे; कायम शेतकऱ्यांसाठी झगडणारा चेहरा अशीच माझी प्रतिमा आहे. यामुळे राजू शेट्टीना माझे नेतृत्व खालसा होते की काय या भावनेमुळे असुरक्षित वाटत असावे, असंही सदाभाऊ खोत म्हणाले आहेत.
जेव्हा श्रीकृष्ण चॅरिटेबल ट्रस्ट कराड हॉस्पिटलमध्ये माझे वडील रामचंद्र खोत कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराचा सामना करत होते त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना थेट मला व्यक्तिगत पातळीवर मदत केली, असं सांगत खोतांनी भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. उपचारादरम्यान जेव्हा माझ्या पतीची स्थिती चिंताजनक झाली त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदाला विचारले की, तुम्ही त्यांना लीलावती हॉस्पिटल मुंबईला का हलवत नाही? त्यावेळी सदाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लीलावतीचा खर्च झेपणार नाही, असे सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः हेलिकॉप्टरची व्यवस्था करून माझ्या पतीस लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलवले आणि संपूर्ण वैद्यकीय खर्चाचीसुद्धा व्यवस्था केली होती, असे खोतांच्या आईंनी आवर्जून सांगितलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या मदतीच्या आठवणीने खोत भावनिक झाले. त्यांना अश्रूही अनावर झाले होते. शेतकरी संप सुरू झाल्यापासून मंत्री सदाभाऊ खोत यांचा संपूर्ण परिवार आई, पत्नी सुमन आणि मुलगा सागर आणि सुनील शासकीय निवासस्थानी थांबलेले आहेत; ज्यावर संप काळात खासदार राजू शेट्टी टीका करत आहेत. त्यावेळीही संयमाने खोतांनी शेट्टींना उत्तर दिले.
सदाभाऊ खोत यांच्या आई रत्नाबाई म्हणाल्या की, "आमच्या कुटुंबासाठी मंत्रिपद महत्त्वाचे नाही; ही वेळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवण्याची आहे!". अनाहूतपणे वाचलेल्या या बातमीनंतर देवेंद्र फडणवीस यांच्याविषयीचा जनतेमधील आदर शतपटीने वाढला आहे!
( इंग्रजी नियतकालिक फ्री प्रेस जर्नल मुंबई ११ जून २०१७ च्या बातमीचा मराठी भावानुवाद)