दर महिन्याला होतो एवढ्या वाघांचा मृत्यू; धक्कादायक आकडेवारी समोर आली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2023 08:18 AM2023-09-22T08:18:35+5:302023-09-22T08:18:53+5:30
वाघाच्या संवर्धनासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जातात.
अतुल जयस्वाल
अकोला - गेल्या २०२२ या संपूर्ण वर्षभरात देशात एकूण १२१ वाघांचा मृत्यू झाला होता. यावर्षी २१ सप्टेंबरपर्यंतच देशात तब्बल १४२ वाघांचा मृत्यू झाला आहे. म्हणजे महिन्याला सुमारे १५ वाघांचा विविध कारणांनी मृत्यू होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे
राज्याने गमावले ३० वाघ
महाराष्ट्रात गेल्या वर्षभरात २७ वाघांचा मृत्यू झाला होता. यंदा सप्टेंबर अखेरपर्यंतच विविध कारणांनी तब्बल ३० वाघांचा मृत्यू झाला आहे.
मग वाघांचा मृत्यू का ?
भारतीय वन्यजीव कायद्याच्या अनुसूचीमध्ये समावेश असलेल्या वाघाला संरक्षण लाभले असून, वाघाच्या संवर्धनासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जातात. यानंतरही शिकार, नैसर्गिक मृत्यू, अपघात, आपसातील झुंजी आदी कारणांमुळे दरवर्षी वाघांचे मृत्यू होतात.
१२ वर्षांतील उच्चांक
वर्ष मृत्यू झालेले वाघ
२०१२ ८८
२०१३ ६८
२०१४ ७८
२०१५ ८२
२०१६ १२१
२०१७ ११७
२०१८ १०१
२०१९ १०६
२०२० १०६
२०२१ १२७
२०२२ १२१
२०२३ १४२