...म्हणून दूध उत्पादक शेतकऱ्यांनी गाढवाला दूध पाजून केले आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2021 10:41 AM2021-08-09T10:41:16+5:302021-08-09T10:41:49+5:30

Farmers in Sangamner: दूध व्यवसायातील अनिश्चितता काही प्रमाणात कमी व्हावी व दूध उत्पादकांना दिलासा मिळावा, यासाठी दूध उत्पादक आपल्या मागण्यांसाठी सातत्याने संघर्ष करत आहेत.

... So the milk producing farmers started agitation by milking the donkeys | ...म्हणून दूध उत्पादक शेतकऱ्यांनी गाढवाला दूध पाजून केले आंदोलन

...म्हणून दूध उत्पादक शेतकऱ्यांनी गाढवाला दूध पाजून केले आंदोलन

Next

संगमनेर : दूध खरेदीचे दर वारंवार कमी केले जात असल्याने राज्यातील दूध उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. दूध व्यवसायातील  अनिश्चितता काही प्रमाणात कमी व्हावी व दूध उत्पादकांना दिलासा मिळावा, यासाठी दूध उत्पादक आपल्या मागण्यांसाठी सातत्याने संघर्ष करत आहेत. दूध उत्पादक शेतकऱ्यांनी क्रांतीदिनी सोमवारी ( दि. ९) संगमनेर तालुक्यातील मंगळापुर येथे शासनाचा निषेध करत गाढवाला दुध पाजले. या आंदोलनाच्या माध्यमातून दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांच्या संदर्भाने सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती, महाराष्ट्र यांच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. ( milk producing farmers started agitation by milking the donkeys)
दुधाला एफआरपीचे संरक्षण मिळावे यासाठी निर्णय घेण्यासाठी कॅबिनेट नोट बनविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही प्रक्रिया वेगाने पूर्ण करा. यासह असलेल्या इतरही मागण्या मान्य करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. असे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

Web Title: ... So the milk producing farmers started agitation by milking the donkeys

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.