...म्हणून राज ठाकरेंनी नाकारला एअर इंडियाच्या विमानातून प्रवास

By admin | Published: May 27, 2017 05:04 PM2017-05-27T17:04:47+5:302017-05-27T17:29:29+5:30

आठवड्याच्या सुरूवातीला राज ठाकरे एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करणार होते त्यावेळी ही घटना घडली.

... so Raj Thackeray denied his trip to Air India | ...म्हणून राज ठाकरेंनी नाकारला एअर इंडियाच्या विमानातून प्रवास

...म्हणून राज ठाकरेंनी नाकारला एअर इंडियाच्या विमानातून प्रवास

Next

ऑनलाइन लोकमत

मुंबई. दि. 27- एअर इंडिया आणि राजकीय नेते यांच्यामध्ये होणारा वाद काही नविन गोष्ट नाही. शिवसेना खासदार रविंद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला चपलेनं मारल्याचं प्रकरण अजूनही ताज आहे. आता पुन्हा एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी राजकीय नेत्याला थांबवल्याचं समोर आलं आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना सिक्युरिटीसह विमान प्रवासाला एअर इंडियाकडून परवानगी नाकारण्यात आली.  टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे. या आठवड्याच्या सुरूवातीला राज ठाकरे एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करणार होते त्यावेळी ही घटना घडली. एअर इंडियाकडून नियमांचा दाखल देत शस्त्र असलेल्या अंगरक्षकांसह विमानाने प्रवास करू शकत नाही असं राज ठाकरे यांना सांगण्यात आलं होतं. मुंबई ते ग्लावियर असा प्रवास राज ठाकरेंना करायचा होता. 

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे त्यांच्या सिक्युरिटी स्टाफसह मुंबई विमानतळावर गेले होते. त्यावेळी विमानाच्या आत शस्त्र नेण्यास परवानगी नसल्याचं एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आलं होतं.  पण त्यावेळी राज ठाकरे यांनी तिथे गोंधळ न करता ते घरी परतले. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सिक्युरिटीसह विमानाने प्रवास करायला न मिळाल्याने राज ठाकरे नाराज तर होते पण त्यांनी तेथे गोंधळ केला नाही. तसंच मनसेकडूनही याविषयी विरोध झाला नाही.
 
उड्डाण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या नागरी विमान सुरक्षा विभागानुसार राष्ट्रपती, पंतप्रधान आणि एसपीजी सुरक्षा असणाऱ्या व्यक्तीला पर्सनल सिक्युरिटीसह विमानाने प्रवास करण्याची मुभा असते.  पीएसओ व्यतिरिक्त धोका लक्षात घेता फक्त स्कायमार्शल्सना हत्यारांसहीत विमानाने प्रवास करण्याची मुभा असते.
 

Web Title: ... so Raj Thackeray denied his trip to Air India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.