"...तर हे आचारसंहितेचे उल्लंघन, भाजपवर अॅक्शन व्हायला हवी! पण..."; संजय राऊतांचा EC ला थेट सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2024 12:22 PM2024-04-01T12:22:31+5:302024-04-01T12:23:28+5:30
संजय राऊत म्हणाले, "निवडणूक आयोगाला प्रश्न करायची इच्छा आहे, की कोड ऑफ कंडक्ट केवळ भाजप विरोधकांसाठीच आहे का?
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, संपूर्ण देशभरात सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला जोरदार सुरूवात केली आहे. सर्वच राजकीय पक्षाचे नेते एकमेकांवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. नव-नवे मुद्दे उपस्थित करत आपापल्या विरोधकांना खिंडित पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. यातच आता, "कोड ऑफ कंडक्ट केवळ भाजप विरोधकांसाठीच आहे का?" असा प्रश्न शिवसेना (ठाकरे गट) नेते तथा खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाला विचारल आहे. एवढेच नाही, तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून प्रचारासाठी फिरत आहेत. जेव्हा निवडणुकीच्या तारखा जाहीर होतात तेव्हा, कुणी पंतप्रधान नसतो, तो सामान्य नागरिक राहतो, उमेदवार राहतो. त्यांचा आणि सरकारी यंत्रणेवर होणारा खर्च पक्षाच्या (भाजप) खात्यावर जायला हवा. जर असे झाले नाही, तर हे आचारसंहितेचे उल्लंघन आहे. भाजपवर अॅक्शन व्हायला हवी, असेही राऊतांनी म्हटले आहे. ते पत्रकारांसोबत बोलत होते.
काय म्हणाले संजय राऊत? -
संजय राऊत म्हणाले, "निवडणूक आयोगाला प्रश्न करायची इच्छा आहे, की कोड ऑफ कंडक्ट केवळ भाजप विरोधकांसाठीच आहे का? पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला सर्व लवा-जमा घेऊन पंतप्रधान म्हणून प्रचारासाठी फिरत आहेत. त्यांचे सरकारी स्पेशल फ्लाइट, मग त्याला फोर्स-1 म्हणा, नाही तर फोर्स- 2 म्हणा. सरकारी खर्चाने आणि सरकारी यंत्रेणेसह निवडणूक प्रचार करत आहेत.
...तर हे आचारसंहितेचे उल्लंघन -
आता मुंबईत येतील (नरेंद्र मोदी) 10 जनसभा घेतील. जेव्हा निवडणुकीच्या तारखा जाहीर होतात तेव्हा, कुणी पंतप्रधान नसतो, कुणी मंत्री नसतो. तो सामान्य नागरिक राहतो, उमेदवार राहतो. त्यांचा आणि सरकारी यंत्रणेवर होणारा खर्च पक्षाच्या (भाजप) खात्यावर जायला हवा. जर असे झाले नाही, तर हे आचारसंहितेचे उल्लंघन आहे. भाजपवर अॅक्शन व्हायला हवी. मात्र असे होणार नाही. नोटीस जाईल, काँग्रेसला, शिवसेनेला, तृणमूल काँग्रेसला, पण नरेंद्र मोदींना जाणार नाही. ही देशाची लोकशाही आहे.
मुंबई करांनी आपल्याला मते का द्यावीत?
ज्या पद्धतीने आपण धारावी अदानींना विकली, ज्या पद्धतीने आपला धारावीसह मुंबईही अदानींना विकण्याचा कट आहे, असे आरोप करत, मुंबई करांनी आपल्या मते का द्यावीत? असा सवालही राऊत यांनी यावेळी पंतप्रधान मोदींना केला. "आपण या आपण पंतप्रधान आहात. अजूनही आपल्याला वाटते आपण पंतप्रधान आहात, पण आपण आता पंतप्रधान नाही. जेव्हा निवडणूक जाहीर होते, तेव्हा आपण जास्तीत जास्त कार्यवाहक पंतप्रधान असतात. पण आपण त्याच पद्धतीने फिरत असाल आणि घोषणा करत असाल, लोकांना धमक्या देत असाल, तर हे चालणार नाही," असेही संजय राऊत यांनी यावेळी म्हटले आहे.