... तर उद्याच चीनमधील 90 भारतीय 'मायदेशी' येतील, पृथ्वीराज बाबांनी करून दाखवलं
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2020 09:24 AM2020-02-26T09:24:00+5:302020-02-26T09:26:48+5:30
लोकमत डॉट कॉमने www.lokmat.com याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले होतं.
मुंबई - चीनमध्ये कोरोना वायरसने थैमान घातले असून आत्तापर्यंत 2 हजार पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे, तेथील अनिवासी नागरिकांना त्यांच्या देशाकडून मायदेशी नेण्यात येत आहे. भारत सरकारनेही चीनमध्ये अडकलेल्या 650 भारतीयांना मायदेशी सुखरुप पोहोचवले आहे. मात्र, अद्यापही चीनमधील काही महत्वाच्या शहरांमध्ये भारतीय नागरिक फसले असून घरवापसी करण्याची विनंती या भारतीयांकडून होत आहे. त्यातच, मराठमोळ्या अश्विनी पाटील यांनी भारत सरकारकडे एअरलिफ्ट करण्याची विनंती केली होती. त्यानंतर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अश्विनीसोबत फोनवरुन संवाद साधत मदतीचे आश्वासन दिले होते.
लोकमत डॉट कॉमने www.lokmat.com याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले होतं. त्यानंतर, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी अश्विनीशी व्हिडीओ कॉलद्वारे संपर्क साधला. तसेच, देशपातळीवर आणि पराराष्ट्र मंत्रालयाशी सातत्याने संपर्क करुन चीनमधील भारतीयांचा विश्वास वाढवला. आता, या सर्व भारतीयांसाठी गुडन्यूज आहे. कारण, लवकरच ते मायदेशी परतणार आहेत.
Video : चीनमध्ये अडकलेल्या अश्विनीला पृथ्वीराज 'बाबांचा' व्हॉट्सअप कॉल
''चीनमधील वुहान शहरात जवळपास 90 भारतीय अडकले आहेत त्यामधील 8 लोक हे महाराष्ट्रीय आहेत. मी त्या 8 ही जणांशी तसेच त्यांच्या परिवारातील सदस्यांशी सुद्धा फोनवरून चर्चा केली. अडकलेल्या भारतीयांना भारतात परत येण्याची इच्छा आहे व तसे भारतीय दुतावासाकडून सुद्धा प्रयत्न सुरू आहेत,'' अशी माहिती माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिलीय. तसेच, चीनमधील भारतीय दुतावासातील अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, चीन सरकारकडून उद्या भारतीय वायुदलाचे विमान उतरविण्यास जर परवानगी मिळाली तर भारतीय वायुदलाचे एक विमान उद्या चीनकडे रवाना होईल. आपले सर्व भारतीय सुरक्षितरित्या भारतात परत यावेत, यासाठी मी सदिच्छा व प्रार्थना व्यक्त करतो, असेही चव्हाण यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन म्हटले आहे.
मोदीजी, आम्हालाही 'एअरलिफ्ट' करा; वुहानमध्ये अडकलेल्या मराठमोळ्या तरुणीची साद
दरम्यान, चीनमध्ये अडकलेल्या आणि मूळच्या सातारच्या अश्विनी पाटील यांच्याशी पृथ्वीराज चव्हाण व्हॉट्सअप कॉलद्वारे यांनी संपर्क साधून संवाद साधला होता. अश्विनी यांच्याशी संवाद साधताना सध्या वुहान येथील उपलब्ध सुविधांबद्दल त्यांनी माहिती घेतली. तसेच त्यांना आश्वासक धीर देत चीनमधील भारतीय अधिकाऱ्यांशी संवाद साधून लवकरात लवकर त्यांना मुंबईत आणण्यात येईल, असेही ते म्हणाले होते. पृथ्वीराज चव्हाण यांच्या एका फोन कॉलने अश्विनीला मोठा धीर मिळाला आहे. विशेष म्हणजे, पर्यायी पासपोर्टचीही व्यवस्था होईल, यादरम्यान कोणतीही अडचण आली तर डायरेक्ट संपर्क साधण्याचही चव्हाण यांनी अश्विनीला दिला होतं.
There are still about 90 Indians stuck at Wuhan, China. 8 of them are from Maharashtra. I’ve spoken to all of them and their families here. I’ve been told that the Air Force flight will be landing tomorrow in China. We all pray for their safe and early return. #Coronaviriuspic.twitter.com/Y5UcTAuqKb
— Prithviraj Chavan (@prithvrj) February 25, 2020