...म्हणून उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला; शरद पवारांना दिलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 08:13 PM2023-04-19T20:13:33+5:302023-04-19T20:14:17+5:30

पवार अनेकदा ते मातोश्रीवर आले आहेत. उद्धव ठाकरेंनीही सिल्व्हर ओकला जाऊन त्यांची भेट, मार्गदर्शन घेतले आहे असं राऊत यांनी सांगितले.

...so Uddhav Thackeray resigned as CM; Sanjay Raut Answer given to Sharad Pawar | ...म्हणून उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला; शरद पवारांना दिलं उत्तर

...म्हणून उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला; शरद पवारांना दिलं उत्तर

googlenewsNext

मुंबई - अलीकडेच एका मुलाखतीत शरद पवारांनी महाविकास आघाडीला विचारात न घेता उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला असं विधान केले होते. त्यामुळे मविआतील विसंवाद समोर आला होता. त्यावर संजय राऊतांना विचारले असता, मी महाविकास आघाडी नव्हती तेव्हापासून शरद पवारांच्या जास्त संपर्कात आहे. अडीच वर्षात शरद पवारांचा उद्धव ठाकरेंशी चांगला सुसंवाद होता असं त्यांनी सांगितले. 

रश्मी ठाकरे सक्रीय राजकारणात उतरणार?; संजय राऊतांचं मोठं विधान

संजय राऊत म्हणाले की, पवार अनेकदा ते मातोश्रीवर आले आहेत. उद्धव ठाकरेंनीही सिल्व्हर ओकला जाऊन त्यांची भेट, मार्गदर्शन घेतले आहे. उद्धव ठाकरेंनी राजीनामा देऊ नये, बहुमत चाचणीला सामोरे जावे अशी सगळ्यांची इच्छा होती. परंतु अतिसंवेदनशील असल्याने उद्धव ठाकरेंना ते सहन झाले नाही. आपलीच माणसे ज्यांना इतके काय दिले तरीही ते सोडून गेले. त्या भावनेतून ठाकरेंनी राजीनामा दिला. परंतु त्यावरून आता वाईट वाटण्याचं कारण नाही असं त्यांनी सांगितले. 

तसेच विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा नाना पटोलेंनी द्यायला नको होता. परंतु कुठलीही चर्चा न करता तो निर्णय घेतला गेला. महाविकास आघाडी सरकार पडण्याची सुरुवात तिथून झाली. आता हा विषय होऊन गेला. आहे त्या परिस्थितीला सामोरे जाऊन लढत जाऊ. शरद पवार हे अनुभवी नेते, संसद पाहिलीय, संसदीय राजकारणात ५० वर्षापासून जास्त आहे. त्यामुळे त्यांनी अनेकदा ते मत मांडले आहे असंही संजय राऊत म्हटले. 

शरद पवारांचं राजकारण विश्वासघाताचे नाही
बाळासाहेब कळायला फार सोपे होते, अखंड वाचन करणारे, लोकांना भेटणारे, प्रचंड मेहनत करणारे व्यक्ती होते. लोकांना कळायला अवघड वाटेल परंतु समोर गेल्यावर ते आपल्यासारखेच असतात. शरद पवारही मोठे नेते आहेत. शरद पवारांचे राजकारण घातकी नाही. देशात त्यांच्याबद्दल प्रतिमा निर्माण करण्यात आली. वसंतदादा पाटलांचे सरकार पाडल्यानंतर त्यांची प्रतिमा बदलली, या देशात सरकारे पाडली गेली नाहीत का? सरकार पहिल्यांदाच पाडले जातायेत असं नाही. फक्त शरद पवारांनीच सरकार पाडले असे नाही असं सांगत संजय राऊतांनी पवारांच्या राजकारणावर भाष्य केले. 

Web Title: ...so Uddhav Thackeray resigned as CM; Sanjay Raut Answer given to Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.