"...मग आम्ही काय गोट्या खेळतोय काय?", चंद्रकांत पाटलांनी संजय राऊतांना सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2024 06:15 PM2024-08-09T18:15:43+5:302024-08-09T18:47:38+5:30

Chandrakant Patil : संजय राऊत यांनी देत दिल्ली भाजपवाल्यांच्या बापाची आहे का? आगामी काळात भाजपला दाखवून देऊ, असा इशारा दिला. यावर आता तुम्ही दाखवणार आहे तर मग आम्ही काय गोट्या खेळतोय काय? असा प्रतिसवाल करत भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांना चांगलंच फटकारलं आहे.

"...so what are we playing?", chandrakant patil attack on sanjay raut maharashtra politics | "...मग आम्ही काय गोट्या खेळतोय काय?", चंद्रकांत पाटलांनी संजय राऊतांना सुनावलं

"...मग आम्ही काय गोट्या खेळतोय काय?", चंद्रकांत पाटलांनी संजय राऊतांना सुनावलं

Chandrakant Patil : मुंबई : राज्यात विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. यासाठी सर्वच पक्षांकडून विधानसभा निवडणुकीची तयारी केली जात आहे. तसंच, आतापासूनच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु होत आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्ली दौरा केल्यानंतर भाजपने जोरदार टीका केली केली. 

या टीकेला प्रत्युत्तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देत दिल्ली भाजपवाल्यांच्या बापाची आहे का? आगामी काळात भाजपला दाखवून देऊ, असा इशारा दिला. यावर आता तुम्ही दाखवणार आहे तर मग आम्ही काय गोट्या खेळतोय काय? असा प्रतिसवाल करत भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांना चांगलंच फटकारलं आहे. दाखवणार, बघून घेतो, अशा भाषेचा आता लोकांना कंटाळा आला आहे. तुम्ही दाखवणार असाल तर आम्ही काय गोट्या खेळतो काय? असा जोरदार पलाटवर चंद्रकांत पाटलांनी केला आहे. 

("उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्रि‍पदासाठी हुजरेगिरी, पण...", भाजप नेत्यांचा जोरदार हल्लाबोल)

आम्हीही विधानसभेची तयारी व्यवस्थित केली आहे, खोटं लोकांसमोर मांडून एखादी गोष्ट वारंवार मांडली तर ती लोकांना खरी वाटली. त्यामुळेच आम्हाला थोडासा फटका बसला. लोकसभेत दहा जागा अशा आहे की त्या तीन ते चार हजार मतांनी आम्ही मागे पडलो. त्या दहा जागा आल्या असत्या तर आमच्या २७ जागा झाल्या असत्या. यातही आम्ही १२७ विधानसभा मतदारसंघात आम्ही पुढे आहोत, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

एकूणच महाराष्ट्रात त्यांच्या आणि आमच्या मतांमध्ये फक्त २ लाखांचं फरक आहे. मुंबईत तसंच कोकणात आम्ही त्यांच्या पेक्षा जास्त जागा निवडून आल्या आहेत. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे, कल्याण, रायगड, पालघर, रत्नागिरीची जागा आम्ही घेतली, याचा तुम्ही अभ्यास करणार आहात की नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

याचबरोबर, कोकणावर तुमची मुंबईत शिवसेना उभी राहिली. कोकणातला माणूस मिलमध्ये, हॉटेलमध्ये काम करायला आला. तो तुमचा व्होटर झाला. त्या कोकणात तुमची फक्त एकच जागा आहे. कॉंग्रेसची एक जागा होती, ती १३ करून त्यांचं भलं केलं. राष्ट्रवादीचे कधीच आठ आले नाहीत. त्यांचे आठ करून त्यांचं भलं केलं. तुम्ही तुमचं नुकसान केलं. तुमचे १८ चे ९ झालात. त्यात तुमचं नुकसान झालं. असंही चंद्रकांत पाटलांनी सुनावलं.

Web Title: "...so what are we playing?", chandrakant patil attack on sanjay raut maharashtra politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.