तर तुमची मोबाईल बॅटरी खराब नाही होणार

By admin | Published: March 29, 2017 06:28 PM2017-03-29T18:28:25+5:302017-03-29T18:52:10+5:30

हल्ली स्मार्टफोनचा वापर इतका होतो की, त्याची बॅटरीही लवकर डिस्चार्ज होते आणि मग वारंवार फोन चार्ज करावा लागतो.

So your mobile battery will not be bad | तर तुमची मोबाईल बॅटरी खराब नाही होणार

तर तुमची मोबाईल बॅटरी खराब नाही होणार

Next

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 29 - हल्ली स्मार्टफोनचा वापर इतका होतो की, त्याची बॅटरीही लवकर डिस्चार्ज होते आणि मग वारंवार फोन चार्ज करावा लागतो. मात्र आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत ज्याचा वापर केल्यानंतर तुम्हाला वारंवार बॅटरी चार्ज करण्याची गरज पडणार नाही. अनेकदा असे होते की, आपण फोन चार्जिंगला लावतो आणि झोपून जातो त्यानंतर सकाळी उठल्यावर फोन चार्जिंग बंद करतो. पण असं करण चुकीचं आहे हे तुम्हाला माहिती आहे का?. आपल्यापैकी अनेकांची तक्रार असते की, स्मार्टफोनची बॅटरी लवकर खराब होते पण बॅटरी खराब होण्यामागचं खरं कारण तुम्हाला माहित आहे का? नाही ना? चला तर मग आज आम्ही तुम्हाला नेमकं कारण आणि त्यावर उपाय सांगतो.

आपल्यापैकी अनेकजण हे दोन वर्ष फोन वापरतात आणि त्यानंतर बदलतात. सकाळी घरातून बाहेर पडण्यापूर्वी मोबाईल पूर्णपणे चार्ज असावा यासाठी अनेकजण रात्री फोन चार्जिंगसाठी लावतात आणि सकाळी बंद करतात. पण रात्रभर चार्जिंग केल्याने फोनच्या बॅटरीवर परिणाम होतो. त्यामुळे त्यांच्या फोनची बॅटरी लवकर खराब होते तसेच फोनही हँग होण्यास सुरुवात होते. म्हणूनही हे दोन वर्षापर्यंतच फोन वापरतात आणि त्यानंतर नवा फोन घेतात.

आपण ज्या स्मार्टफोन्सचा वापर करतो त्याची बॅटरी ‘Lithium-Ions’ची बनलेली असते. गरजेपेक्षा जास्त चार्ज असल्यास बॅटरीवर परिणाम होतो. फोनचा चार्जर बनविणारी कंपनी Ankerचे प्रवक्ता Edo Campos यांनी सांगितले आहे की, स्मार्टफोन हे स्मार्ट असतात त्यामुळे त्यांना माहिती असतं की कधी आणि किती चार्ज होण्याची गरज आहे. अँड्रॉइड आणि आयफोन्समध्ये एक खास प्रकारची चिप बसविण्यात आलेली असते. ही चीप फोन चार्ज झाल्यानंतर येणा-या विद्युत प्रवाहाला थांविण्याच काम करते. म्हणजेच जर तुम्ही तुमचा फोन ओरिजनल चार्जरने चार्ज कराल तर तुमची बॅटरी लवकर खराब होणार नाही.

 

Web Title: So your mobile battery will not be bad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.