‘सोशल’ भावनांचे होणार विश्लेषण

By admin | Published: March 28, 2017 03:03 AM2017-03-28T03:03:03+5:302017-03-28T03:03:03+5:30

सोशल मीडियावरून व्यक्त होणाऱ्या मजकुरातील भावनांची वर्गवारी करणे आता शक्य होणार आहे. त्यासाठी पुण्यातील प्रगत

'Social' emotion will be analyzed | ‘सोशल’ भावनांचे होणार विश्लेषण

‘सोशल’ भावनांचे होणार विश्लेषण

Next

पुणे : सोशल मीडियावरून व्यक्त होणाऱ्या मजकुरातील भावनांची वर्गवारी करणे आता शक्य होणार आहे. त्यासाठी पुण्यातील प्रगत संगणन विकास केंद्राने (सी-डॅक) ई-विदुर ही संगणक प्रणाली विकसित केली आहे. मजकूर आणि त्यामधून प्रतित होणारी त्याची मन:स्थिती यांमधील परस्परसंबंधांचे विश्लेषण या प्रणालीद्वारे करता येणार आहे.
‘सी-डॅक’ने ई-विदुरसह मोझॅक, डिजिटायल या संगणक प्रणाली आणि परम शावक डीएल जीपीयू हा सुपरकॉम्प्युटर तयार केला आहे. कार्यकारी संचालक डॉ. हेमंत दरबारी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. टिष्ट्वटर, फेसबुकसारख्या सोशल मीडियाद्वारे संवाद साधणे आणि विचार मांडणे सहज सोपे झाले आहे. अशा मजकुराच्या भावनिक पातळीची सकारात्मक, नकारात्मक आणि अलिप्त अशी वर्गवारी करता येणार आहे. सोशल मीडियावरील माहितीमधून दिलेल्या विषयानुसार भावनिकतेची पातळी या तंत्राने आपोआप मोजली जाते. संशयास्पद नेटवर्क्सच्या सोशल मीडियावरील हालचाली, एखाद्या गुन्ह्याचा पुरावा मिळवणे, ड्रगचे व्यापारी, अतिरेकी, अवैध निर्वासित त्यांचा तपास करणे, विशिष्ट ट्रेंड पाहणे, नेटिझन्समधील चर्चेचा विषय, भावना, प्रतिसादांची उकल करणे अशा विविध बाबी या प्रणालीतून साध्य करता येणार आहेत.
‘मोझॅक’ ही संगणक प्रणाली नवीन औषधनिर्मितीसाठी फायदेशीर ठरणार आहे. सध्या अस्तित्वात असलेले एखादे औषध इतर कोणत्या आजाराची उपयुक्त ठरू शकते का, याचे संशोधन वेगाने करता येणार आहे. त्यामुळे औषधनिर्मितीचा वेग वाढण्यास मदत होणार आहे, तर ‘डिजिटायल’ या प्रणालीमुळे संगणकावर तयार केलेले इलेक्ट्रॉनिक्स रेकॉर्डस्, आॅडिओ, व्हिडिओ, ईमेल, स्लाईड तसेच इतर महत्त्वाचे दस्तावेज दीर्घ काळ जतन करणे शक्य होणार आहे.

सी-डॅकचा आज स्थापना दिन

 सी-डॅकचा मंगळवारी स्थापना दिन असून त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात चारही संगणक प्रणालींचे अनावरण केले जाणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आयुकाच्या चंद्रशेखर सभागृहात दुपारी ३ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या वेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर, लखनौ येथील प्रा. सरोज कांता मिश्रा यांची प्रमुख उपस्थिती असेल. डॉ. नारळीकर यांचे ‘अंतराळ आणि संगणक : सुरुवातीच्या काळातील अनुभव’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.

Web Title: 'Social' emotion will be analyzed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.