नगर जिल्ह्यात ‘अंनिस’तर्फे सामाजिक प्रबोधन यात्रा
By admin | Published: November 6, 2014 03:52 AM2014-11-06T03:52:26+5:302014-11-06T03:52:26+5:30
दलित अत्याचाराच्या घटनांनी सातत्याने ढवळून निघणाऱ्या नगर जिल्ह्यात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) आगामी तीन वर्षे विशेष प्रबोधन करणार आहे
औरंगाबाद : दलित अत्याचाराच्या घटनांनी सातत्याने ढवळून निघणाऱ्या नगर जिल्ह्यात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) आगामी तीन वर्षे विशेष प्रबोधन करणार आहे. जिल्ह्यातील जातीय अत्याचारविरोधी कृती समितीसह एकत्र येत सामाजिक न्यायाची रुजविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
नगर जिल्ह्यातील सोनई हत्याकांड, खर्डा येथील नितीन आगेच्या खुनाचे प्रकरण आणि दिवाळीच्या तोंडावर झालेली जाधव कुटुंबीयांची अमानुष हत्या यांसह दलित अत्याचाराचे एकूण १८३ खटले अद्याप न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांचा निकाल तत्परतेने लावण्यासह जिल्ह्यातील सामाजिक संबंधांतील ताणतणाव दूर करणेही तितकेच महत्त्वाचे असून, त्यादृष्टीने ‘अंनिस’ने पुढाकार घेतल्याचे ‘अंनिस’चे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील म्हणाले.