सोशल मीडिया बनले तरूणाचे रोजगाराचे साधन

By admin | Published: May 15, 2017 09:16 AM2017-05-15T09:16:42+5:302017-05-15T09:16:42+5:30

गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडियामुळे माहितीच्या जगात क्रांती झाली आहे. काही सेकंदात माहितीची आदान-प्रदान होत असते.

Social Media became a livelihood tool for the youth | सोशल मीडिया बनले तरूणाचे रोजगाराचे साधन

सोशल मीडिया बनले तरूणाचे रोजगाराचे साधन

Next

आॅनलाईन लोकमत
 जळगाव, दि. १४ -गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडियामुळे माहितीच्या जगात क्रांती झाली आहे. काही सेकंदात माहितीची आदान-प्रदान होत असते. सोशल मीडियाचे तंत्रज्ञान हाताळण्यासाठी उच्च शिक्षणच असले पाहिजे असे नाही. तर त्या क्षेत्रातील आवड, नवनवीन तंत्रज्ञान शिकण्याची आवड असली की अल्पशिक्षीत तरूणही सोशल मीडिया लिलया हाताळू शकतात. याचा अनुभव अमळनेरच्या लक्ष्मीकांत सोनार या तरूणाच्या माध्यमातून येतो.

अल्पशिक्षित असलेल्या लक्ष्मीकांत सोनारने जिद्दीच्या जोरावर सोशल मीडियाचे तंत्रज्ञान आत्मसात केल्याने आज त्याचे सोशल मीडिया हेच रोजगाराचे साधन बनले आहे. लक्ष्मीकांतची कौटुंबिक स्थिती म्हटली तर हालाखीचीच. वडील मकरंद सोनार हे मूकबधीर आहे. तर आई दुसरीकडे घरकाम करते. परिस्थिती अभावी त्यालाही जास्त शिक्षण घेता आले नाही. त्यामुळे दहावी अनुत्तीर्ण असलेल्या लक्ष्मीकांतवरच कमी वयात घर सांभाळण्याची जबाबदारी आली. सुरुवातीला तो शहरातील एका संगणकाच्या दुकानावर कामाला लागला. ते काम करत असताना, त्याने संगणकाचे ज्ञान, इंटरनेटचे ज्ञान मिळविले. तो संगणक क्षेत्रात तरबेज झाला. 

गेल्या काही वर्षांपासून फेसबुक, व्हॉटस्अ‍ॅप यासारख्या सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. अमळनेर सारख्या लहान शहरातदेखील फेसबुक वापरणाऱ्यांची संख्या ७० हजारच्या आसपास आहे. या सोशल साईटचा उपयोग मनोरंजासाठी होत असला तरी त्यातून उत्पन्नदेखील मिळू शकते. ज्या युजर्संना फेसबुकचा वापर करण्यासाठी पुरेसा वेळ नाही. अशांचे फेसबुक पेज तयार करुन त्यातून रोजगार मिळू शकतो हे लक्ष्मीकांतने हेरले. 

आपले विचार जगापर्यंत अगदी काही क्षणात पोहोचविण्यासाठी सोशल मीडियापेक्षा पेक्षा चांगले माध्यम कोणतेही नाही. अर्थात याचा बहुतांश वापर हा टाईमपास आणि मनोरंजनासाठी केला जातो. ठराविक लोक या माध्यमाचा वापर अत्यंत विधायक करत असल्याचे करतात. आज सोशल मीडियावर विविध सेलिब्रेटीपासून ते अगदी गल्लीबोळातील संस्था प्रतिष्ठाने, भाऊ-दादा, स्थानिक नेते आदींचे पेजेस आहेत. त्यांची पेजेस तालुका आणि गावास केंद्र्रस्थानी ठेवणारी आहेत. मात्र प्रसिद्धीची हाव असणाऱ्या या लोकांना आपले अकाऊंट मॅनेज करणे जमत नाही किंवा पुरेसा वेळ त्यांच्याकडे नाही, अशा लोकांचे फेसबुक पेज तयार करून ते रोज अपडेट करण्याची जबाबदारी एखाद्या व्यक्तीकडे सोपवतात. लक्ष्मीकांत सोनारकडे शहर आणि तालुक्यातील ४३ लोकांचे सोशल मीडियाच्या पेजची जबाबदारी आहे.

व्यवसायिक, राजकारणी, तरुण, उद्योजक, यांच्याशी संबंधित लक्ष्मीकांत सोनार रोज अपडेट करीत असतो.त्या बदल्यात या व्यक्तींकडून त्याला काही पैसे मिळतात. त्यातून तो आपल्या कुटुंबाच्या चरितार्थ चालवत असतो. त्याची क्रिएटिव्हिटी पाहून दिवसेंदिवस त्याच्याकडे सोशल साईटचे काम वाढत आहे.

त्याने २०१३ पासून अमळनेर लाईव्ह नावाचे पेज सोशल मीडियावर जनतेसमोर आणले. प्रारंभी अमळनेर शहरातील विविध घडामोडी, शहराची खास वैशिष्ठये आदी बाबी अपडेट करण्यात यायच्या हळूहळू पेजेसचे चाहते वाढू लागले. या पेजेसवर दररोज नवनवीन विषयांचे वैविध्य राखल्याने ते सोशल मीडीयाधारकांच्या पसंतीस उतरले आहे. विशेष बाब म्हणजे घडामोडी आणि वायरल न्यूजच्या बाबतीत या पेजसच्या लाईक्स आणि व्ह्यूवर्सने झपाट्याने वाढत असून दोन हजारचा टप्पा ओलांडला आहे. 
सोशल मीडियाच पेजेसची जबाबदारी सांभाळून तो ग्राफिक्स डिजीटल डिझाईनचा व्यवसाय करतो.

Web Title: Social Media became a livelihood tool for the youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.