सोशल मीडियावर देशभक्तीला उधाण

By admin | Published: January 26, 2017 03:51 AM2017-01-26T03:51:59+5:302017-01-26T03:51:59+5:30

प्रजासत्ताक दिन असो वा स्वातंत्र्य दिन हे दिवस जसे जवळ येतात, त्या वेळेस आठवड्याभरापासून देशभक्तीला सर्वत्र उधाण आलेले दिसते.

Social media floods patriotism | सोशल मीडियावर देशभक्तीला उधाण

सोशल मीडियावर देशभक्तीला उधाण

Next

मुंबई : प्रजासत्ताक दिन असो वा स्वातंत्र्य दिन हे दिवस जसे जवळ येतात, त्या वेळेस आठवड्याभरापासून देशभक्तीला सर्वत्र उधाण आलेले दिसते. त्यात गेल्या काही वर्षांत संवेदनशील झालेल्या फेसबुक, टिष्ट्वटर आणि व्हॉट्सअ‍ॅप या सोशल मीडियावर तर देशभक्तीच्या पोस्ट्स आणि फोटोस्चे शेअरिंग वाढताना दिसते. यंदाही सोशल मीडियावर प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने नेटिझन्सचे देशप्रेम उफाळून आले आहे.
२६ जानेवारीच्या निमित्ताने देशाचा गौरव करणाऱ्या पोस्ट्स, फोटो आणि माहितीशीर तपशिलांचे शेअरिंग वाढलेले दिसून येत
आहे. शिवाय, व्हॉट्सअ‍ॅपवर आपल्या डीपीवर तिंरग्यांचे छायाचित्र ठेवण्याला अनेक जणांनी पसंती दर्शविली आहे. शिवाय, याचे वैशिष्ट्य म्हणजे बऱ्याच नेटिझन्सनी सोशल मीडियाचा वापर करत जागरूक होत राष्ट्रध्वजाचा वापर करण्यासंदर्भातील नियमावलीही सोशल शेअर केली आहे. त्यामुळे बऱ्याच प्रमाणात याविषयीची जागरूकता सामान्यांमध्ये वाढलेली दिसून येते आहे. यानिमित्ताने बरेच जण ध्वजारोहण करतानाचे छायाचित्रही सोशल मीडियावर शेअर करताना दिसून येतात. त्यामुळे गेल्या काही वर्षांत सोशल मीडियाच्या निमित्ताने का होईना, देशभक्तीचे
प्रेम पुन्हा एकदा फुललेले दिसून येत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Social media floods patriotism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.