सामाजिक सौहार्दासाठी 'सोशल पीस फोर्स

By admin | Published: July 28, 2014 12:40 PM2014-07-28T12:40:08+5:302014-07-28T12:40:22+5:30

काल्पनिक जगताचा वापर करून अविवेकी हिंसाचार घडविणार्‍या या प्रवृत्तींना त्यांच्याच भाषेत विवेकाने उत्तर देण्यासाठी पुण्यामध्ये काही तरुणांनी एकत्र येऊन 'सोशल पीस फोर्स'नावाचा उपक्रम सुरू केला आहे.

Social Peace Force for Social Responsibility | सामाजिक सौहार्दासाठी 'सोशल पीस फोर्स

सामाजिक सौहार्दासाठी 'सोशल पीस फोर्स

Next
>पुणे : फेसबुकवर देवी-देवता, महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध झाल्यानंतर भावना तीव्र होतात. त्याचे पडसाद उमटायला सुरुवात होते. या प्रकारामागे कोण आहे, त्यांचा उद्देश काय आहे, याची साधी माहितीही न घेता सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले जाते. काल्पनिक जगताचा वापर करून अविवेकी हिंसाचार घडविणार्‍या या प्रवृत्तींना त्यांच्याच भाषेत विवेकाने उत्तर देण्यासाठी पुण्यामध्ये काही तरुणांनी एकत्र येऊन 'सोशल पीस फोर्स'नावाचा उपक्रम सुरू केला आहे. 
फेसबुकवर शिवाजीमहाराज, संभाजीमहाराज आणि देवदेवतांबद्दल आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध झाल्यानंतर पुण्यामध्ये दंगल उसळली. माथे भडकलेल्या तरुणांनी सार्वजनिक आणि शासकीय मालमत्तेचे नुकसान केले. यातच एका मुस्लिम तरुणाचा काहीही दोष नसताना बळी गेला. तब्बल तीन आठवडे पुण्यामध्ये तणावाचे वातावरण होते. पोलिसांनी आणि काही सामाजिक संघटनांनी प्रयत्न करून शांतता प्रस्थापित केली. पण, आपला उद्देश सफल होत नाही म्हटल्यावर समाजकंटकांनी पुन्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत आक्षेपार्ह मजकूर फेसबुकवर टाकला. 
हे असेच सुरू राहिले आणि त्यावर समाजामधून हिंसक प्रतिक्रिया उमटत राहिल्या, तर समाजामध्ये अराजक माजण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे हे आपणच थांबवायला हवे, या विचारातून आयटीमध्ये काम करणारे आनंद शिंदे, जयदीप पठारे, अक्षय शिंदे, ऐश्‍वर्या पाटील, भास्कर नागमोडे, प्रमोद शेंडकर यांच्यासह काही तरुण एकत्र आले. 
सामाजिक कार्यकर्ते रवी घाटे यांच्या 'एम्पॉवर फाउंडेशन' या संस्थेच्या माध्यमातून तरुणांनी 'सोशल पीस फोर्स' या नावाने फेसबुकवर पेज तयार केले. समाजामध्ये शांती नांदावी याकरिता तरुणांनी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले. बघता बघता या पेजवर २८ हजार सभासद झाले. इंटरनेटचे जाळे अधिकाधिक विस्तारत चालले आहे. परंतु, तंत्रज्ञानाचा गैरवापर करून सामाजिक संतुलन बिघडवण्याचा अपप्रवृत्तींचा प्रयत्नाला लगाम घालण्याचे काम या ग्रुपने सुरू केले. 
फेसबुकवरील या ग्रुपच्या पेजसाठी केवळ एक महिन्यामध्ये २८ हजार सभासद सामाजिक सलोख्यासाठी पुढे आले आहेत. ज्या मार्गाने हल्ला होतो आहे त्याच मार्गाने त्याला उत्तर देण्याची आवश्यकता आहे. फेसबुकवरच्या हिंसाचाराला फेसबुकद्वारेच विवेकी उत्तर द्यायला हवे, त्याचा वास्तविक जीवनावर परिणाम होता कामा नये, अशी ग्रुपची धारणा असल्याचे रवी घाटे यांनी सांगितले. केवळ फेसबुकवरचा आक्षेपार्ह मजकूर हटवण्यासाठीच हा ग्रुप नाही,तर इतर सामाजिक उपक्रमही राबवले जात आहेत. या तरुणांनी एकत्र येऊन गेल्या वर्षी दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांना मदत केली. या मदतीमधून ८00 गावांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. याकामासाठी फेसबुकने या ग्रुपला पुरस्कार दिला होता. फेसबुकने निवडलेल्या देशातील दोन ग्रुपपैकी 'एम्पॉवर फाउंडेशन' ही एक संस्था होती.
फेसबुकवरील या ग्रुपच्या पेजवर आता २८ हजार सभासद झाले आहेत. केवळ एक महिन्यामध्ये २८ हजार सभासद सामाजिक सलोख्यासाठी पुढे आले आहेत. ज्या मार्गाने हल्ला होतो आहे त्याच मार्गाने त्याला उत्तर देण्याची आवश्यकता आहे. फेसबुकवरच्या हिंसाचाराला फेसबुकद्वारेच विवेकी उत्तर द्यायला हवे, त्याचा वास्तविक जीवनावर परिणाम होता कामा नये, अशी ग्रुपची धारणा असल्याचे रवी घाटे यांनी सांगितले.
तर पाच मिनिटांत मजकूर काढला जातो
■ फेसबुकवर कोणताही आक्षेपार्ह मजकूर किंवा छायाचित्र, व्हिडिओ टाकण्यात आला असेल, तर तो काढून टाकण्यासाठी पोलिसांना २४ तास लागतात. परंतु फेसबुक वापरणार्‍या १ हजार ६00 लोकांनी जर 'रिपोर्ट स्पॅम' केले, तर हा मजकूर फेसबुकवरुन अवघ्या पाचच मिनिटांत काढून टाकण्यात येतो. जर असा आक्षेपार्ह मजकूर वेळेत काढून टाकण्यात आला, तर त्याचे लोण पसरू शकणार नाही.
 (प्रतिनिधी) ..
 

Web Title: Social Peace Force for Social Responsibility

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.