Social Viral : एक फाईट वातावरण टाईट !
By admin | Published: November 9, 2016 09:02 AM2016-11-09T09:02:28+5:302016-11-09T10:44:34+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयाची घोषणा केल्यानंतर सोशल मीडियावर याची मोठ्या प्रमाणात चर्चा होऊ लागली आहे
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 9 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयाची घोषणा केल्यानंतर सोशल मीडियावर याची मोठ्या प्रमाणात चर्चा होऊ लागली आहे. लोकांनी सोशल मीडियावर सुरू असलेल्या ट्रेंडनुसार हॅशटॅगद्वारे मजेदार पोस्ट शेअर केले आहेत. काही जणांनी 500 आणि 1000 नोटा बाद होणार त्यावर खिल्ली उडवली, तर काहींनी या निर्णयाचे स्वागत करत मोदींचे कौतुक केले आहे.
सोशल मीडियावरील काही मजेदार पोस्ट
500 रुपयांच्या जुन्या नोटा बकरीला चरण्यासाठी देण्यात आल्याचे पोस्ट सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहे. त्यामुळे आता 500 आणि 1000च्या नोटा आता बकरीदेखील चरणार नाही, असे सांगण्यात आले आहे.
विरोधकांची खिल्ली
विरोधी पक्षातील नेत्यांचीदेखील खिल्ली उडवण्यात आली आहे. 'हम नही खेलते मोदी चीटिंग करता है'. हा फोटो पाहिल्यानंतर कुणीही हसणं थांबूच शकत नाही.
एटीएमबाहेर तुफान गर्दी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 आणि 1000 च्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयाची घोषणा केल्यानंतर देशभरात एटीएमबाहेर तुफान गर्दी पाहायला मिळाली. यावरुनदेखील सोशल मीडियावर बरेच विनोद व्हायरल झाले. 'नासाने टिपलेली एटीएम केंद्रांबाहेरील गर्दी'
पतंजलीच्या नोटा येणार?
यानंतर पतंजलीच्या माध्यमातून मॅगी वगैरेसारखे प्रोडक्ट बाजारात आणणा-या योग गुरू बाबा रामदेव यांच्या फोटोसहीत 'आता आमच्या नोटा येणार' ही पोस्टदेखील भलतीच व्हायरल झाली आहे.
तर काही जण 500 आणि 1000च्या नोटांमध्ये फरसाण वगैर खात आहेत, कारण या नोटांचा आता काही उपयोग नाही.
सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर तर तुफान विनोदी पोस्ट मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक
दरम्यान, काळा पैसा आणि विदेशातून येणा-या नकली नोटांना रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. 'एकही मार लेकीन सॉलिड मारा' असे म्हणत लोकांनी मोदींची कौतुक केले आहे.