सामाजिक जाणिवेचा नगररचनाकार गमावला

By admin | Published: June 18, 2015 02:44 AM2015-06-18T02:44:03+5:302015-06-18T02:44:03+5:30

ज्येष्ठ वास्तुविद्या विशारद चार्ल्स कोरिया यांच्या निधनाने वास्तूरचनेला नवे परिमाण देणारा सामाजिक जाणिवेचा नगररचनाकार आपण गमावला आहे.

The social worker lost the city-maker | सामाजिक जाणिवेचा नगररचनाकार गमावला

सामाजिक जाणिवेचा नगररचनाकार गमावला

Next

मुंबई : ज्येष्ठ वास्तुविद्या विशारद चार्ल्स कोरिया यांच्या निधनाने वास्तूरचनेला नवे परिमाण देणारा सामाजिक जाणिवेचा नगररचनाकार आपण गमावला आहे. एकविसाव्या शतकातील नगरी म्हणून गौरविल्या जाणाऱ्या नवी मुंबईच्या सुनियोजित रचनेमध्ये कोरिया यांचा मुख्य वास्तुविशारद म्हणून मोलाचा सहभाग होता. सिडको आणि तत्कालीन बॉम्बे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (बीएमआरडीए) यामध्ये त्यांचे लक्षणीय योगदान होते. अल्प उत्पन्न गटासाठी परवडणारी घरे आणि आदर्श नगर नियोजनाचा त्यांचा आग्रह सामाजिक बांधिलकी जपणारा होता. त्यांच्या निधनाने एक जाणिवेचा वास्तुविशारद गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोरिया यांना श्रद्धांजली वाहिली.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतातील वास्तुकला विकसित करण्यात मोलाची भूमिका त्यांनी बजावली. केरळमध्ये चार्ल्स कोरिया यांच्या कल्पनेतून साकारलेली लो इन्कम हाऊसिंगची योजना देशभरात गाजली होती. १९७२ साली त्यांना पद्मश्री आणि २००६ साली पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. १९३० साली सिंकदराबादमध्ये जन्मलेल्या चार्ल्स यांनी मुंबईतील सेंट झेवियर्स महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केले. त्यांनी युनिव्हर्सिटी आॅफ मिशिगन आणि प्रतिष्ठित अशा मेसाचुसेट्स इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी एमआयटीमध्ये शिक्षण घेतले. वास्तुकलेसाठी त्यांना आगा खान पुरस्कार, प्रीमियर इम्पिरियल आॅफ जपान आणि रॉयल इन्स्टिट्यूट आॅफ ब्रिटिश आॅर्किटेक्ट्स : आरआयबीएच्या रॉयल गोल्ड मेडलसमवेत अन्य पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. १९८४ साली त्यांनी मुंबईत नागरी संरचना संशोधन संस्थेची स्थापना केली. ही संस्था पर्यावरण संरक्षण, नागरी समुदायांच्या विकासासाठी काम करते.

कोरिया यांचे प्रकल्प
महात्मा गांधी संग्रहालय, साबरमती. मध्य प्रदेश विधानभवन, मध्य प्रदेश. ब्रिटिश कौन्सिल, दिल्ली. जवाहर कला केंद्र, जयपूर. नॅशनल क्राफ्ट्स म्युझियम, नवी दिल्ली. भारत भवन, भोपाळ. सिटी सेंटर, कोलकाता. कला अकादमी, गोवा. एमसी गव्हर्नर इन्स्टिट्यूट फॉर ब्रेन रिसर्च, बोस्टन. इस्माईली सेंटर, टोरांटो. आयुका, पुणे. कांचनजुंगा, पेडर रोड, मुंबई.

Web Title: The social worker lost the city-maker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.