‘गेमबाज’ची सोसायट्यांत धमाल

By admin | Published: May 18, 2016 01:04 AM2016-05-18T01:04:17+5:302016-05-18T01:04:17+5:30

लोकमतच्या वतीने गेमबाज उपक्रम कोथरूडमधील स्वप्नशिल्प व कपिल अभिजात सोसायटी या ठिकाणी आयोजित करण्यात आला

In the societies of 'Gamebazaar' | ‘गेमबाज’ची सोसायट्यांत धमाल

‘गेमबाज’ची सोसायट्यांत धमाल

Next


पुणे : लोकमतच्या वतीने गेमबाज उपक्रम कोथरूडमधील स्वप्नशिल्प व कपिल अभिजात सोसायटी या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. महिलांचा रॅम्प वॉक, लहान मुलांसाठी नृत्य स्पर्धा, छोटे-छोटे प्रश्न विचारण्याची स्पर्धा, संगीत खुर्ची या आणि अशा विविध खेळांमध्ये लहान मुलांसह वयोवृद्धदेखील आपले वय विसरून सहभागी झाले होते. वृद्ध नागरिक जणू आपल्या बालपणातच गेल्याचे दिसून येत होते. महिलांच्या रॅम्प वॉकमध्येही उत्साह होता. यातही सर्व महिला उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या होत्या. स्वप्नशिल्प सोसायटीतील अपर्णा भट, पंकजा नारखेडे, रेहा सोमवंशी, अपर्णा शहा, सुनील खारकर, श्रद्धा कारखानीस, रेवती भंडारी, रश्मी बावस्कर तर कपिल अभिजात सोसायटीतील संध्या धोंडसे, माधुरी पाटील, सई वाडे, शीला केसकर, सरिता धारवाडकर, अंजली भावकर, सुनीता जोशी, मंजुश्री केळकर, सुमन ठकार आदी सदस्यांनी स्पर्धांत सहभाग घेतला. स्वप्नशिल्प सोसायटीतील पूनम कारखानीस तर कपिल अभिजात सोसायटीतील निशा अग्रवाल पैठणीच्या मानकरी ठरल्या.
स्पर्धा झाल्यानंतर बक्षिसे वितरित करण्यात आली. दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर सध्या पाण्याचे महत्त्व आणि त्याबद्दलची जनजागृती करणे महत्त्वाचे आहे. याच हेतूने या वेळी सोसायटीतील सर्वांना पाणीबचतीची शपथ देण्यात आली. लोकमतच्या या उपक्रमाचे नागरिकांनी कौतुक केले. तसेच यापुढेही हे उपक्रम असेच सुरू ठेवावेत, असे मत येथील नागरिकांनी व्यक्त केले. स्वप्नशिल्प सोसायटीचे चेअरमन विवेक विप्रदास व पूनम कारखानीस तसेच कोथरूड येथील डहाणूकर कॉलनीतील कपिल अभिजात सोसायटीचे चेअरमन सुमुख रायरीकर यांचे कार्यक्रमास सहकार्य लाभले.
राज मुच्छल, श्रीराम क्रिएशन, मनिष मार्केट रविवार पेठ यांच्यातर्फे पैठणी पुरस्कृत करण्यात आल्या.

Web Title: In the societies of 'Gamebazaar'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.