सॉफ्टवेअर इंजिनीअरवर सामूहिक बलात्कार

By admin | Published: February 29, 2016 04:43 AM2016-02-29T04:43:31+5:302016-02-29T04:47:03+5:30

हिंजवडीमधील आयटी कंपनीतील सॉफ्टवेअर इंजिनीअरवर तिचा सहकारी व त्याच्या मित्रांनीच सामूहिक बलात्कार केल्याची घृणास्पद घटना धानोरीमध्ये शनिवारी रात्री घडली.

Software Engineer gang rape | सॉफ्टवेअर इंजिनीअरवर सामूहिक बलात्कार

सॉफ्टवेअर इंजिनीअरवर सामूहिक बलात्कार

Next

पुणे : हिंजवडीमधील आयटी कंपनीतील सॉफ्टवेअर इंजिनीअरवर तिचा सहकारी व त्याच्या मित्रांनीच सामूहिक बलात्कार केल्याची घृणास्पद घटना धानोरीमध्ये शनिवारी रात्री घडली. शीतपेयामध्ये गुंगीचे औषध टाकून तरुणीला बेशुद्ध केल्यावर तिच्यावर अत्याचार करण्यात आला. या प्रकरणी मुंढवा पोलिसांनी पाच तरुणांसह एका तरुणीलाही अटक केली आहे.
पीडित तरुणीचा कंपनीतील सहकारी अभिनव संतोष साही (२८, रा. शिवालिक सोसायटी, टिंगरेनगर, मूळ रा. देहरादून) व त्याचे मित्र आनंदविष्णू प्रल्हाद चन्नार (२८, रा. गोकूळनगर, धानोरी, मूळ रा. केरळ), देवब्रत प्रशांत दुबे (२४, रा. भैरवनगर, धानोरी, मूळ रा. वाराणसी, उत्तर प्रदेश), अभिजित गुणेंद्रकुमार देवराय (२६, रा. कलवड वस्ती, लोहगाव, मूळ रा. आगरतळा, त्रिपुरा), दीप्तांशु अखिलेशकुमार गुप्ता (२३, रा. सहकारनगर), तनुश्री हरबंससिंग जग्गी उर्फ चौधरी (३०, रा. धानोरी पोलीस चौकीजवळ) यांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीचे वडील केंद्र शासनाचे निवृत्त अधिकारी आहेत. हे कुटुंब पुण्यातच राहते. शनिवारी संध्याकाळी ही तरुणी व अभिनव कंपनीमधील एका कार्यक्रमास जाणार होते. दोघेही एकाच भागात राहत असल्याने त्यांचे फोनवर एकत्र जाण्याबाबत बोलणे झाले. त्यानुसार पीडित तरुणी तिची कार घेऊन गुंजन सिनेमागृहाजवळ गेली. तेथे अभिनव तिच्या गाडीत बसला.
कार्यक्रम सुरू होण्यास वेळ असल्याचे सांगत अभिनवने तिला कॉफी पिऊ, असे सुचवले. त्यानंतर दोघेही मुंढव्यातील एका हॉटेलमध्ये गेले. तेथे तरुणीने ‘आईस टी’ मागवला. दोन कप आईस टी पिल्यानंतर तिला गुंगी यायला लागली. ती ग्लानीमध्ये असतानाच अभिनवने तिला गाडीत बसविले. त्यानंतर त्याने देवब्रतला फोन करुन मैत्रिणीला घेऊन येत असल्याचे सांगितले. दोन बेडरुमच्या या फ्लॅटमध्ये आधीच आनंदविष्णू, देवब्रत,अभिजीत, दिप्तांशू, तनुश्री हजर होते.
या तरुणीला बेडरुममध्ये ठेवल्यानंतर आरोपींनी मद्यपान केले. त्यानंतर तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. शुद्धीवर आल्यानंतर तिने घरी जाऊन हा प्रकार कुटुंबीयांना सांगितला. वडिलांसोबत जाऊन तिने पोलिसांत तक्रार केली. सहायक पोलीस आयुक्त रवींद्र रसाळ यांनी त्यानंतर आरोपींना ताब्यात घेतल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Software Engineer gang rape

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.