पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनियर तरुणीची आत्महत्या

By admin | Published: December 14, 2015 10:11 AM2015-12-14T10:11:06+5:302015-12-14T10:21:19+5:30

खासगी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करणा-या तरुणीने विषप्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना पुण्यामध्ये घडली आहे.

A software engineer has committed suicide in Pune | पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनियर तरुणीची आत्महत्या

पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनियर तरुणीची आत्महत्या

Next

ऑनलाइन लोकमत 

पुणे, दि. १४ - खासगी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करणा-या तरुणीने विषप्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना पुण्यामध्ये घडली आहे. तपस्या भास्कर असे या तरुणीचे नाव असून ती ३१ वर्षांची आहे. जगताप डेअरी चौकाजवळील बोरा हॅपी होम सोसायटीमध्ये घर भाडयाने घेऊन ती रहात होती. 

सोमवारी सकाळी घरमालक घरभाडयासाठी गेले असताना तिने आत्महत्या केल्याचे समोर आले. दरवाजाची बेल वाजवूनही दरवाजा आतून उघडत नसल्याने घरमालकांनी पोलिसांना बोलावले. पोलिसांनी घरात प्रवेश केल्यानंतर तपस्या मृतावस्थेत आढळून आली. साधारण दोन दिवसांपूर्वी तिने विषप्राशन करुन आत्महत्या केली असण्याचा संशय आहे. तपस्या मूळची जयपूरची आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला आहे. 

Web Title: A software engineer has committed suicide in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.