सोहराबुद्दीन एन्काउंटर : भाजपा नेते कटारिया दोषमुक्त

By admin | Published: February 27, 2015 02:47 AM2015-02-27T02:47:55+5:302015-02-27T02:47:55+5:30

बहुचर्चित सोहराबुद्दीन शेख व तुलसी प्रजापती बनावट एन्काउंटर खटल्यातून विशेष सीबीआय न्यायालयाने गुरुवारी भाजपा नेते

Sohrabuddin encounter: BJP leader Kataria guilty | सोहराबुद्दीन एन्काउंटर : भाजपा नेते कटारिया दोषमुक्त

सोहराबुद्दीन एन्काउंटर : भाजपा नेते कटारिया दोषमुक्त

Next

मुंबई : बहुचर्चित सोहराबुद्दीन शेख व तुलसी प्रजापती बनावट एन्काउंटर खटल्यातून विशेष सीबीआय न्यायालयाने गुरुवारी भाजपा नेते व राजस्थानचे माजी गृहमंत्री गुलाबचंद कटारिया व व्यापारी विमल यांना दोषमुक्त केले. गेल्यावर्षी याच न्यायालयाने भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनाही या प्रकरणातून दोषमुक्त केले.
कटारिया व विमल यांच्याविरोधात सबळ पुरावे नसल्याचे निरीक्षण नोंदवत विशेष सीबीआय न्यायाधीश एम.बी. गोसावी यांनी या दोघांना यातून दोषमुक्त केले.
शेखचा नोव्हेंबर २००५मध्ये एन्काउंटर झाला. त्यानंतर यातील प्रमुख साक्षीदार प्रजापतीचाही एन्काउंटर झाला. शेख हा राजस्थानमध्ये घुसखोरी करत होता व त्याने विमल यांच्याकडेही खंडणी मागितली होती. त्या वेळी विमल
यांनी कटारिया यांची मदत
घेतली. (प्रतिनिधी)

Web Title: Sohrabuddin encounter: BJP leader Kataria guilty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.