सोलेंनी राखला गडकरींचा गड

By admin | Published: June 25, 2014 01:29 AM2014-06-25T01:29:07+5:302014-06-25T01:29:07+5:30

विधान परिषदेच्या नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाची निवडणूक एकतर्फी जिंकून भाजपचे अनिल सोले यांनी ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांचा गड कायम राखला. पहिल्या पसंतीच्या मतांचा कोटा पूर्ण करीत

Solanki's fort is a fortress of Gadkari | सोलेंनी राखला गडकरींचा गड

सोलेंनी राखला गडकरींचा गड

Next

अमरावतीत देशपांडेंची आघाडी: सोले ३१ हजार २५९ मतांनी विजयी, देशपांडे ९८४३ मतांनी आघाडीवर
नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाची निवडणूक एकतर्फी जिंकून भाजपचे अनिल सोले यांनी ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांचा गड कायम राखला. पहिल्या पसंतीच्या मतांचा कोटा पूर्ण करीत सोले यांनी काँग्रेसचे डॉ. बबनराव तायवाडे यांना तब्बल ३१ हजार २५९ मतांनी पराभूत केले.
तर अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात रिंगणात असलेल्या १७ उमेदवांरापैकी एकानेही पहिल्या फेरीत १३,०६२ मतांचा कोटा पूर्ण केला नाही. परिणामी दुसऱ्या पसंतीच्या क्रमांकासाठी मतमोजणी करण्यात आली़बाराव्या फेरीअखेर शिक्षक आघाडीचे श्रीकांत देशपांडे यांनी ९८४३ मते प्राप्त करून मतांची आघाडी कायम ठेवली.
नागपूर पदवीधर मतदारसंघात पहिल्यांदाच राजकारणात उतरलेले फुले शाहू आंबेडकरी संघटनेचे माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये यांनी तायवाडेंच्या मागोमाग मते घेत राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले. तायवाडे व गजभिये यांच्या मतांच्या बेरजेपेक्षा सोले यांना जास्त मते मिळाली. गजभियेंनी तायवाडेंची मते कापल्यामुळे सोलेंच्या विजयाचे अंतर वाढले.
शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतील मतमोजणीत अकराव्या फेरी अखेर अरुण शेळके यांना ५६८४ तर वसंत खोटरे यांना ४२८७ मते प्राप्त केली होती. तसेच शेखर भोयर १६१३, श्रीकृष्ण अवचार १४९१, सुभाष गवई १२१२, प्रकाश तायडे १०६८, संतोष हुशे यांना ९३९ मते प्राप्त केली. तसेच बाराव्या फेरीअखेर श्रीकांत देशपांडे ९८४३, अरुण शेळके ५८१४, वसंतराव खोटरे ४४३०, शेखर भोयर १७००, श्रीकृष्ण अवचार १६२१ मते मिळालीत.अमरावती, यवतमाळ, बुलडाणा, अकोला व वाशीम या जिल्ह्यातील ४४ हजार ५२६ शिक्षक मतदारांपैकी २७ हजार ७६४ मतदारांनी सहभाग नोंदविला होता. पहिल्या पसंतीच्या क्रमांकासाठी सर्व उमेदवारांनी प्रचारादरम्यान जीवाचे रान केले. मात्र मतमोजणीनंतर पहिल्या फेरीत अवैध मते १५३५ तर १०७ मतदारांनी नोटाचा वापर केल्याचे स्पष्ट झाले. २२ हजार १२२ वैध मतांपैकी पहिल्या फेरीत श्रीकांत देशपांडे यांना ८ हजार ७८८, अरुण शेळके ५ हजार ३५१, वसंत खोटरे ४ हजार १६, शेखर भोयर १४६०, गणपत अवचार १३७७, प्रकाश तायडे १००६, सुभाष गवई ११२१, वर्षा निकम ६६६, विजय गुल्हाने ५०६, रामदास बारोटे ६२२, नरहरी अर्डक १५१, अजमल खान ३४, गुलाम अहेमद खान ७८, जयदीश देशमुख १३, सर्जेराव देशमुख ४, रवींद्र मेंढे ५८, संतोष हुशे यांना ८७१ इतकी मते प्राप्त केली. विभागीय आयुक्त डी. आर. बनसोड यांच्या मार्गदर्शनात बाद पद्धतीने मतमोजणीची प्रक्रिया राबविण्यात आली. पहिल्या पसंतीच्या मताचा कोटा पूर्ण झाला नसल्याने रिंगणात असलेल्या १७ उमेदवारांपैकी १५ उमेदवारांना मिळालेल्या दुसऱ्या क्रमांकाच्या पसंतीच्या मतमोजणीला प्रारंभ झाला. ही मतमोजणी उशिरापर्यंत सुरू राहणार असल्याने श्रीकांत देशपांडे, अरुण शेळके व वसंत खोटरे यांच्यात दुसरा क्रमांक पसंतीच्या मतासाठी लढत राहील असे चित्र होते. मात्र अकराव्या फेरीअखेर घोषित झालेल्या निकालानुसार श्रीकांत देशपांडे यांना ९५८६ , अरूण शेळके यांना ५६८४ तर वसंतराव खोटरे यांना ४२८७ मते मिळालीत. बाराव्या फेरीतही देशपांडे-शेळके या दोन उमेदवारांमध्ये लढत कायम आहे. मतांची आघाडी बघता श्रीकांत देशपांडे हे बाजी मारतील, असे चित्र आहे.
गडकरींचा रेकॉर्ड कायमच
जून २००८ मध्ये झालेल्या पदवीधर निवडणुकीत नितीन गडकरी यांनी ५२ हजार ७६१ मते घेतली होती. सोलेंचा मितभाषी स्वभाव पाहता ते गडकरींची गादी राखू शकतील का, अशी शंका त्यांच्याच पक्षात व्यक्त केली जात होती. मात्र, सोले सरांनी तब्बल ५२ हजार ४८५ मते घेत गडकरींच्या मतांशी जवळीक साधली. मात्र ते गडकरींचा विक्रम मोडू शकले नाही. मात्र, गडकरींनी तायवाडे यांना २३ हजार ८३५ मतांनी नमविले होते. सोलेंनी एक पाऊल पुढे टाकत ३१ हजार २५९ मतांनी ही निवडणूक जिंकली.
मोदी लाट कायम- फडणवीस
लोकसभा निवडणुकीत दिसलेली मोदी लाट अद्यापही कायम असल्याचा प्रत्यय या निवडणुकीत सोलेंनी मिळविलेल्या एकतर्फी विजयामुळे दिसून आला. लोकसभा जिंकलो, पदवीधरमध्येही यश मिळाले. विजयाची हीच परंपरा आम्ही विधानसभा निवडणुकीतही कायम ठेवू, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
महायुतीच्या सरकारची चाहूल- गडकरी
प्रा. अनिल सोले यांनी पदवीधर मतदारसंघातून मिळविलेला विजय म्हणजे केंद्रातील मोदी सरकारवर दाखविलेल्या विश्वासाची जशी पावती आहे, तशीच आगामी काळात महाराष्ट्रात येणाऱ्या महायुतीच्या सरकारची ती चाहूलही आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय परिवहन व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. नागपूर पदवीधर मतदारसंघाचे मी चार वेळा प्रतिनिधित्व केले आहे. या काळात पदवीधरांचे प्रश्न सातत्याने लावून धरले. आता प्रा. सोले हे प्रश्न पुढे लावून धरतील आणि पदवीधरांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करतील, असा मला विश्वास आहे. विदर्भातील सुशिक्षित बेरोजगार पदवीधरांना नोकरीतील विविध संधी मिळवून देण्यासोबतच केंद्र सरकारच्या विविध योजना या मतदारसंघातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी आणण्याकरिता मी माझी संपूर्ण शक्ती केंद्रात लावील, असेही ते म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
महायुतीच्या सरकारची चाहूल- गडकरी
प्रा. अनिल सोले यांनी पदवीधर मतदारसंघातून मिळविलेला विजय म्हणजे केंद्रातील मोदी सरकारवर दाखविलेल्या विश्वासाची जशी पावती आहे, तशीच आगामी काळात महाराष्ट्रात येणाऱ्या महायुतीच्या सरकारची ती चाहूलही आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय परिवहन व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. नागपूर पदवीधर मतदारसंघाचे मी चार वेळा प्रतिनिधित्व केले आहे. या काळात पदवीधरांचे प्रश्न सातत्याने लावून धरले. आता प्रा. सोले हे प्रश्न पुढे लावून धरतील आणि पदवीधरांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करतील, असा मला विश्वास आहे.
पदवीधर मतदारसंघ भाजपचाच बालेकिल्ला होता. त्यामुळे विजयाचा विश्वास होताच. कार्यकर्त्यांची मेहनत, विविध संघटनांचे पाठबळ आणि पूर्वासूरीचे या मतदारसंघाचे प्रतिनिधी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विविध प्रश्न सोडवून मतदारांमध्ये निर्माण केलेला विश्वास यामुळे विजय अधिक सुकर झाला. मतदारांनी दाखविलेल्या विश्वासाला आपण तडा जाऊ देणार नाही.
- अनिल सोले, विजयी उमेदवार

Web Title: Solanki's fort is a fortress of Gadkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.