सोलापूर : निवडणुक कामात हलगर्जीपणा दोन पोलिसांवर गुन्हा
By admin | Published: February 21, 2017 09:07 AM2017-02-21T09:07:04+5:302017-02-21T09:07:04+5:30
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या कामात हलगर्जीपणा केलेल्या नांदेडच्या दोन पोलीस कर्मचाºयांवर गुन्हा दाखल करण्यात आला
Next
>ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. २१ - जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या कामात हलगर्जीपणा केलेल्या नांदेडच्या दोन पोलीस कर्मचाºयांवर गुन्हा दाखल केल्याचे पोलीस उपअधीक्षक विजय कबाडे यांनी लोकमतला सांगितले.
बार्शी शहर पोलीस ठाण्यात पोलीस नाईक दत्तात्रय कांबळे व पो.कॉ.अरविंद्रसिंग काटगर या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पोलिसांचा कस लागणार आहे. आघाडी व युती तुटल्याने पोलिसांवरील बंदोबस्ताचा ताण आणखी वाढणार आहे. त्यामुळे सोलापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी बाहेरुन बंदोबस्त मागविण्यात आला होता. बार्शी शहर पोलीस ठाण्यात निवडणुकीच्या कामकाजासाठी नांदेड जिल्ह्यातील सोनखेड पोलीस ठाण्याचे दत्तात्रय कांबळे व पो.कॉ. अरविंद्रसिंग काटगर या दोघांना बोलाविण्यात आले होते.
१७ फेब्रुवारी रोजी ते दोघे सोनखेडहून बार्शीकडे रवाना झाले होते; मात्र त्या दोघांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात २० फेब्रुवारी रोजी रात्री हजेरी लावून येतो असे सांगितले, ते दोघे पुन्हा निवडणुकीच्या कामकाजासाठी पोलीस ठाण्यात हजर झाले नाहीत. बार्शी शहर पोलीस ठाण्याच्या वतीने निवडणूक बंदोबस्त देण्याचे काम सुरु होते; मात्र ते दोघे तेथून निघून गेले.त्यामुळे पोलीस उपअधीक्षक विजय कबाडे यांनी त्या दोन पोलिसांवर गुन्हा दाखल केला आहे.