सोलापूर - १६१ वर्षाचा डिकसळचा धोकादायक पूल

By Admin | Published: August 6, 2016 03:06 PM2016-08-06T15:06:07+5:302016-08-06T15:06:07+5:30

महाड येथील सावित्री नदीवरील ब्रिटिशकालीन पूल कोसळून मोठी दुर्घटना घडल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातून पुणे जिल्ह्याला जोडणारा भीमा नदीवरील डिकसळचा ब्रिटिशकालीन पूल चर्चेत आला आहे

Solapur - A dangerous pool of 161 years of Diksal | सोलापूर - १६१ वर्षाचा डिकसळचा धोकादायक पूल

सोलापूर - १६१ वर्षाचा डिकसळचा धोकादायक पूल

googlenewsNext
>करमाळा तालुका : २००० साली पुलाचे आयुष्य संपल्याचे ब्रिटिश कंपनीचे पत्र
नासीर कबीर / ऑनलाइन लोकमत -
करमाळा, दि. 6 - महाड येथील सावित्री नदीवरील ब्रिटिशकालीन पूल कोसळून मोठी दुर्घटना घडल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातून पुणे जिल्ह्याला जोडणारा भीमा नदीवरील डिकसळचा ब्रिटिशकालीन पूल चर्चेत आला आहे. ब्रिटिशांनी सन १८५५ साली भीमा नदीवर बांधलेल्या या पुलाचे वय १६१ वर्षे असून, सन २००० मध्ये ब्रिटिश सरकारने या पुलाचे आयुष्य संपले असून, वाहतुकीस धोकादायक असल्याचे केंद्र व राज्य सरकारला कळवलं आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून आजही या पुलावरून मोठ्या प्रमाणात जडवाहतूक होत आहे तर या परिसरात भीमा नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसाही सुरू आहे. 
 
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील कोंढारचिंचोली ते इंदापूर तालुक्यातील डिकसळच्या सीमेवरून वाहत जाणाºया भीमा नदीवर हा ब्रिटिशकालीन पूल असून, ब्रिटिशांनी १८५५ साली तो बांधला. पुणे जिल्ह्यातील भिगवणला जवळचा व एकमेव मार्ग म्हणून या पुलावरून करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील जिंती, कोंढारचिंचोली, टाकळी, केत्तूर नं. १ व २, वाश्ािंबे, गोयेगाव, कुंभारगाव, सावडी, दिवेगव्हाण, कात्रज, खातगाव, पोमलवाडी, हिंगणी, गुलमोहोरवाडी, भगतवाडी, घरतवाडी, राजुरी, सोगाव, रामवाडी, कावळवाडी, भिलारवाडी, उम्रड, मांजरगाव, उंदरगाव आदी ३५ गावांचा पुणे जिल्ह्यातील गावांशी दैनंदिन दळणवळणाचा संपर्क आहे. 
डिकसळच्या पुलाचे बांधकाम होऊन १६१ वर्षे पूर्ण झाली असून, या पुलाचे आयुष्यमान केव्हाच संपले आहे. पूल वाहतुकीस धोकादायक असल्याचे लेखी पत्र ब्रिटिश सरकारने १५ वर्षांपूर्वीच केंद्र व राज्य सरकारला पाठविले आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने पुलाच्या दोन्ही टोकाला भीमा नदीवरील जुना रेल्वे पूल कमकुवत असल्याने जडवाहनासाठी धोकादायक जीप, कार, दुचाकी व जडवाहनासाठी वापर करू नये, असे धोक्याचे फलक लावून ठेवले आहेत. त्याची दखल घेऊन महामंडळाने एस.टी.ची वाहतूक बंद केली. पण सर्रास या पुलावरून करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातून बारामती अ‍ॅग्रो, दौंड शुगर, माळेगाव, भवानीनगर आदी साखर कारखान्यांकडे ऊस वाहतूक होते. 
 
खातगाव, कात्रज या भागातून भीमा नदीतील वाळू उपसा करून या पुलावरून जडवाहतूक सर्रास होते. पाच वर्षांपूर्वी कोंढारचिंचोली ते डिकसळ या रस्त्याच्या कामासाठी पुनर्वसन खात्याने दहा क ोटी रुपयांचा निधी खर्च करून पुलासह रस्ता सुस्थितीत केला. पण सध्या पुलावरून मोठ्या प्रमाणात जडवाहतूक होत असल्याने पुलावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. पुलाचे कठडे तुटले आहेत. या परिस्थितीमध्येसुद्धा या पुलावरून बेमालूमपणे जीवाची पर्वा न करता जडवाहतूक सुरू आहे. 
 

Web Title: Solapur - A dangerous pool of 161 years of Diksal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.